Amitabh Bachchan 80th Birthday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस आहेत. बिग बी यांनी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्तानी' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं (amitabh bachchan birthday). पण त्यांना यश मिळालं 'जंजीर' सिनेमातून. त्यानंतर बिग बींनी आजपर्यंत मागे वळून पाहिलं नाही. जसा काळ बदलत गेला, त्याप्रमाणे बिग बींच्या भुमिका देखील बदलत केल्या. आपल्या भुमिकेतून त्यांनी कधी चाहत्यांना निराश केलं नाही. (amitabh bachchan Bollywood entry) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज फक्त भारतातच नाही साता समुद्रापार देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची (amitabh bachchan fans)  संख्या फार मोठी आहे. त्यामुळे जगभरातून त्यांचा प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. वाढदिवस असेल तर आपण समोरच्या व्यक्तीला खास भेट देतो, पण याठिकाणी  बिग बींनीच चाहत्यांना एक अविस्मरणीय Gift दिलं आहे. (amitabh bachchan birthday Gift)


Amitabh Bachchan Fitness : वयाच्या 80 व्या वर्षीही बिग बींचा फिटनेस पंचविशीतल्यांना लाजवणारा


रात्री बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली. तेव्हा बिग बी देखील 'जलसा'मधून बाहेर आले आणि चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. बिग बींची एक झलक पाहिल्यानंतर चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला. (amitabh bachchan all flims)


सध्या बिग बींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  (amitabh bachchan love life) बिग बी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर बिग बींनी छोट्या पडद्यावरही स्वतःचं वेगळं नाव स्थापन केलं. 'कौन बनेगा करोडपती' शोमधून त्यांनी अनेकांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली.