Amitabh Bachchan Fitness : हिंदी चित्रपटसृष्टी आणि सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज 80 वाढदिवस (amitabh bachchan birthday). दमदार चित्रपट (Amitabh bachchan movies), तडफदार भूमिका, धीरगंभीर आवाज आणि रुबाबदार रुप असं म्हटलं की समोर लगेचच एकाच माणसाचा चेहरा येतो तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा. आज कैक दशकं त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सामाजिक भान जपत अनेक जबाबदाऱ्याही पार पाडल्या. पण, या साऱ्यामध्ये त्यांनी आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत पोहोचलेल्या बच्चन यांनी कायमच त्यांच्या फिटनेसला प्राधान्य दिलं. ज्यामुळं पंचविशीतल्या (Fitness at the age of 25) तरुणांनाही त्यांचा हा गुण लाजवून गेला.
सोशल मीडियापासून (Social media) प्रत्यक्ष आयुष्यापर्यंतही बच्चन यांनी फिटनेसला प्राधान्य दिलं. काही सवयींचं त्यांनी अगदी काटेकोरपणे पालन केलं. खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाच्या (Excercise) बाबतीत ते कायम आग्रही दिसले. त्यांच्या याच सवयी अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत.
बच्चन त्यांच्या डाएटविषयी (Amitabh bachchan diet) फारच सजग असल्याचं पाहायला मिळतं. फिटनेसवर लक्ष ठेवतच ते खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये केळ (Banana), सफरचंद (Apple), खजूर (Dates), अंड (Egg) आणि बदाम (Almonds) यांना पसंती देतात. शिवाय ते रोज दूधही पितात.
सकाळच्या वेळी आवळ्याचा रस (Amla juice), नारळ पाणी (Coconut Water) अशा आरोग्यवर्धक ज्यूससोबतच ते तुळशीची पानंही (Eulasi leaves) खातात. जेवणासाठी ते कायम सहज पचणाऱ्या गोष्टींना प्राधान्य देतात. यामध्ये डाळ, चपाती या पदार्थांचा समावेश असतो. रात्रीच्या वेळी ते सूप किंवा तत्सम पदार्थ जेवणात घेतात.
खाण्याच्या या सवयींसोबतच ते शारीरिकदृष्ट्याही बरेच सक्रिय असतात. शतपावली करण्याकडे बिग बींचा कल कायम दिसून येतो. जेवणानंतर लगेचच न झोपता काही वेळ चालणं हे त्यांच्या आरोग्याचं गुपित आहे. रोज सकाळीसुद्धा ते व्यायाम करतात. यामध्ये योगासनं आणि काही व्यायाम प्रकारही समाविष्ट आहेत.
नशेच्या पदार्थांपासून कायम दूर राहणाऱ्या बिग बींनी नेहमीच शाकाहाराला प्राधान्य दिलं आहे. त्यांना कोणत्या आजारानं किंवा शारीरिक व्याधीनं ग्रासलं नाही असं नाही. लिव्हर सिरोसिस, टीबी अशा काही व्याधींनी त्यांना ग्रासलं होतं. पण, यावरही मात करत त्यांनी निरोगी आयुष्याचा आदर्श सर्वांपुढे ठेवला.