Urfi Javed Death Threat : नेहमीच कपड्यांच्या हटके स्टाईलमुळे उर्फी जावेद ही चर्चेचा विषय ठरते. उर्फीची विचित्र फॅशन पाहून अनेकांना आश्चर्य होतं. तिला कुठून ही इन्स्पिरेशन मिळत असेल असा प्रश्न अनेकांना बऱ्याचवेळा पडतो. दरम्यान, तिच्या या फॅशनमुळे आता तिला जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. त्याविषयी उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. उर्फीनं यावेळी तिला मेलच्या माध्यमानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले आहे. तिनं तिला आलेल्या या मेलचा स्क्रिनशॉर्ट देखील शेअर केला आहे. उर्फीनं शेअर केलेल्या त्या मेलमध्ये समोरची व्यक्तीला तिला बोलताना दिसते की 'देशात जी तू घाण पसरवली आहे त्यासाठी लवकरच तुला गोळी मारण्यात येईल.' पुढे याविषयी सांगताना ती व्यक्ती म्हणाली की 'लवकरच तुला गोळी मारण्यात येईल, लवकरच मिशन पूर्ण होईल... देशात जी तू घाण पसरवली आहेस... भारतातील ही घाण साफ होईल.' ही पोस्ट शेअर करत उर्फीनं कॅप्शन दिलं आहे की 'माझ्या आयुष्यातील एक साधारण दिवस.'



उर्फीनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. एका नेटकऱ्यानं सांगितलं की 'मुली तू घाबरू नकोस, तू त्या लोकांविरोधत कायदेशीर करायला हवी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्यांना बोलू दे, तू खरंच एक धाडसी मुलगी आहेस, जी कधीही घाबरलेली नाही. मी तुझा खूप सन्मान करतो, त्यामुळे त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर. फक्त दुर्लक्ष करायचं.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'त्याच्या विरोधात तक्रार दाखल कर... तेव्हा यांना कळेल... ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अशा मुर्ख लोकांकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझं काम करत आमच्या सगळ्यांचे मनोरंजन करत रहा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बिचारी उर्फी तू त्यांच्या विरोधात तक्रार दाखल कर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तू यांच्याकडे दुर्लक्ष कर आपलं काम करत जा... आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.' 


हेही वाचा : VIDEO : 'अरे ले न फोटो', सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यावर भडकला सनी देओल


उर्फी जावेदचा नुकताच स्वांतत्र्य दिनानिमित्ताचा नवा लूक व्हायरल झाला होता. उर्फीनं यानेळी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिचा हा लूक पाहून अनेकांना आश्चर्य झाले तर अनेकांनी तिच्या लूकची स्तुती केली होती.