VIDEO : 'अरे ले न फोटो', सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यावर भडकला सनी देओल

Sunny Deol VIral Video : सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना दुसरीकडे त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्या व्हिडीओत सनी देओल त्याच्या चाहत्याला खूप वाईट वागणूक देत असल्याचे पाहायला येते. त्यामुळे तो ट्रोल होतोय. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 17, 2023, 11:46 AM IST
VIDEO : 'अरे ले न फोटो', सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यावर भडकला सनी देओल title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Deol VIral Video : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा सध्या त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. तारा सिंगचा बॉक्स ऑफिसवर 'गदर' थांबलेला नाही. 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. त्या सगळ्यात सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत अभिनेत्यासोबत फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर सनी देओलनं कशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच सनी देओल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत सनी विमानतळावर असल्याचे पाहायला मिळते. यावेळी सनीला पाहताच तिथे उपस्थित असलेले त्याचे काही चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी धावताना दिसतात. तर दुसरीकडे सनी देओलच्या शेजारी त्याचे काही बॉडीगार्ड्स आणि काही लोक असतात. तितक्यात एक व्यक्ती सनी देओलकडे धावत येते आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी विनंती करते. त्यावेळी सनी हळू हळू चालू लागला हे पाहचा त्या चाहत्यानं सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न केला. फोटो क्लिक करण्यात त्या चाहत्यानं थोडा जास्त वेळ लावला हे पाहता, अरे लवकर काढना फोटो. सनी हे बोलताच त्याच्या बॉडीगार्डनं त्या चाहत्याला मागे ढकलून दिले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सनी देओलचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'यामुळे आम्हाला शाहरुख खान आवडतो. तो कितीही यशस्वी असला तरी तो शांत असतो. सगळ्यांचा आदर करतो. शेतकऱ्याविषयी सनी देओल बोलला नाही तेव्हा त्याच्यात ताकद नव्हती आणि आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चाहत्यांकडे बघू चित्रपट पाहण्याचे आवाहन करतोय. कमीतकमी त्यानं त्याच्या चाहत्यांचा आदर करायला हवा.' 

सनी देओलच्या 'गदर 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील तारा सिंगच्या भूमिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला हे पाहून अनेकांना आश्चर्य झाले आहे. 'गदर 2' चित्रपटानं सहा दिवसात 250 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं 262.48 कोटींची कमाई केली आहे. आज हा चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करणार का या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा : तारा सिंगचा बॉक्स ऑफिसवर 'गदर', 250 कोटींचा आकडा पार; 'पठाण'ला देणार का टक्कर?

सनी देओलच्या या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यात तो पठाण या चित्रपटाला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकेल का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सनी देओलच्या या चित्रपटात सनी देओलशिवाय अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत.