Vanita Kharat On Working With Shahid Kapoor and in Bollywood : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) तिच्या अभिनयाच्या आणि विनोदाच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकली आहेत. वनितानं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटामध्येही काम केलं आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की वनितानं कोणत्या बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केलं आहे. तर वनितानं बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) काम केलं आहे. शाहिदचा लोकप्रिय ठरलेल्या ‘कबीर सिंग’ (Kabir Singh) या चित्रपटात वनितानं एक छोटी भूमिका साकारली होती. दरम्यान, इतक्या वर्षांनंतर वनितानं शाहिद कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनिता गेल्या काही दिवसांपासून तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. शाहिद कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगण्याआधी वनिता तिच्या नवरा काय काम करतो हे सांगितलं या शिवाय तिच्या न्यूड फोटोशूटविषयी सांगितलं. वनितानं ‘संपूर्ण स्वराज' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत कबीर सिंग या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेविषयी आणि शाहिदसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता हे सांगितलं आहे. 



बॉलिवूडमध्ये काम करण्यावर वनिता म्हणाली, 'सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. पण, आपलं काम चांगलं असलं की सगळ्या गोष्टी या सोप्या होतात. बॉलिवूडमधील लोक कलाकारांचा आदर करतात. त्यांनी कधी आपल्याला पाहिलेलं नसतं. त्यामुळे ते खूप नॉर्मल वागतात, पण जेव्हा ते आपल काम पाहतात तेव्हा खूप कौतुक करतात. हे मला कबीर सिंगच्या बाबतीत जाणवलं.'



पुढे शाहीदसोबत काम करतानाचा अनुभव सांगत पुढे वनिता म्हणाली, 'मी शाहीदबरोबर पहिला सीन केल्यानंतर माझ्याबद्दलची त्याची रिअॅक्शन खूपच वेगळी होती. सुरुवातीला तो येऊन भेटला आणि बोलला. पण सीन शूट झाल्यानंतर तो एकदमच भारावून गेला होता. तू खूप चांगलं काम करते. तुझ्याबरोबर काम करताना मला मज्जा आली. चित्रपटानंतर मी शाहीद कपूरबरोबर एका अवॉर्ड शोमध्येही काम केलं. त्यावेळीही तो तेवढ्याच आपुलकीने येऊन मला भेटला. बॉलिवूडमध्ये मला खूप चांगली वागणूक मिळाली.' थोडक्याच शाहीदसोबत काम करताना वनिताला खूप चांगला अनूभव आला होता. 



हेही वाचा : 'तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो...', Palak Tiwari नं आर्यन खानविषयी केला खुलासा


दरम्यान, या आधी वनिता तिच्या न्यूड फोटोवर अनेक काय बोलत होते याविषयी बोलताना म्हणाली की कोणत्याही कमेंट्सवर ती लक्ष देत नाही. तर त्यावर तिच्या मित्रान कॉल करून तिची स्तुती केल्याचं तिनं सांगितलं होतं.