'तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो...', Palak Tiwari नं आर्यन खानविषयी केला खुलासा

Palak Tiwari Talked about Aryan Khan : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानविषयी वक्तव्य केलं आहे. आर्यन आणि पलक बऱ्याचवेळा अनेक पार्ट्यांमध्ये दिसतात. तर पलक लवकरच सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

Updated: Apr 16, 2023, 10:59 AM IST
'तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो...', Palak Tiwari नं आर्यन खानविषयी केला खुलासा  title=
(Photo Credit : Palak Tiwari/ Aryan Khan Instagram)

Palak Tiwari Talked about Aryan Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पलक तिवारी लवकरच 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पलकनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यात सगळ्यात आधी सलमानच्या सेटवर मुलींना कपडे परिधान करण्यावर असलेला नियम आणि त्यानंतर पलकनं स्वत: मी असं म्हटलं नाही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे असे म्हटले होते. दरम्यान, आता पलकनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानविषयी (Aryan Khan) अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या खूप कमी लोकांना माहित आहे. 

पलकनं नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. पलक आणि आर्यन एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. आतापर्यंत अनेकदा त्यांना एकत्र पार्ट्यांमध्येही पाहण्यात आलं आहे. या मुलाखतीत पलकला आर्यन खानविषयी प्रश्न विचारता तो कसा आहे आणि त्याची एक बाजू आहे जी खूप कमी लोकांना माहित आहे असे पलकनं सांगितले. 'तो जसा दिसतो तसाच आहे. तो खूप कमी बोलतो पण जे बोलतो ते अगदी मुद्देसूद आणि प्रभावी बोलतो. तो खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे. कोणत्याही पार्टीतदेखील तो एकटाच दिसतो. जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल तर तो देखील तुमच्याशी हसत हसत बोलतो. पण त्याव्यतिरिक्त जास्त करून तो शांतच असतो,' असं पलक म्हणाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पलक तिवारीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं हार्डी संधूच्या बिजली से जबरदस्त या गाण्यातून कला क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं असून सगळ्यांच्या पसंतीस उतरलं होतं. आता पलकला एक मोठा चित्रपट मिळाला असून ती चक्क सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

हेही वाचा : Miss India 2023 खिताब पटकावणारी 19 वर्षीय Nandini Gupta विषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

या चित्रपटात त्या दोघांव्यतिरिक्त पूजा हेगडे देखील आहे. तर हा चित्रपट ईदच्या निमित्तानं 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. तर या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता वेकेंटश दग्गुबाती देखील दिसणार आहे. तर हा चित्रपट वीरम या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.