पुणे : नटसम्राट डॉ. श्रीराम लागू अनंतात विलीन झालेत. लागू यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी डॉ लागू यांचं पार्थिव पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. डॉ. लागू यांचं मंगळवारी 17 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 डॉ. श्रीराम लागू यांचं मंगळवारी रात्री ८.३० वाजल्याच्या सुमारास निधन झालंय. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं श्रीराम लागू हे त्यांच्या राहत्या घरीच कोसळले होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नी दीपा लागू आणि मुलगा आहे


डाँ. लागू यांचे पुत्र विदेशात होते. ते गुरुवारपर्यंत पोहोचू शकत नसल्याने त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं रूपवेध प्रतिष्ठान तर्फे कळवण्यात आलं होतं. डॉ लागू यांचं नाट्य तसेच सिने क्षेत्रात मोठं योगदान आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुभाष देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ लागू यांचे चाहते यावेळी उपस्थित होते. 


श्रीराम लागू दीर्घकाळापासून आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. 16 नोव्हेंबर 1927 रोजी जन्मलेल्या डॉ. लागू यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. ते एक ईएनटी सर्जन (ENT Surgeon) होते. डॉ. लागू यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखलं जातं.