Zeenat Aman Marriage: हिंदी कलाजगतामध्ये Boldness या शब्दाचा अर्थ कैक वर्षांपूर्वीच कळला आणि रुळला. असं होण्यास कारणीभूत ठरल्या काही अभिनेत्री. याच अभिनेत्रींच्या यादीतलं एक नाव आहे, झिनत अमान. साचेबद्ध भूमिकांना शह देत काहीशा आव्हानात्मक भूमिका झिनत यांनी साकारल्या आणि त्यांचा अंदाज प्रत्येक वेळी चाहत्यांना तितकाच भावला. अशा या झिनत अमान यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच गोष्टींवर वक्तव्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात झिनक अमान या ऑनस्क्रीन जितक्या बोल्ड, तितक्याच वैयक्तिक आयुष्यातही त्या Bold. अशा या अभिनेत्रीनं 'डॉन', 'धर्म वीर', 'कुर्बानी' या आणि अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या. सध्या याच झिनत अमान नव्या पिढीच्या काही नव्या गोष्टींमध्ये रमताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या वर्तुळातही त्या फार छान एकरुप होत आहेत. अशा या झिनत अमान यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. 


एक नातं आणि ते लग्न... 


झिनत यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून पोस्ट केल्यानंतर अनेकांच्याच नजरा त्या पोस्टवर आणि त्याहूनही पोस्टच्या कॅप्शनवर खिळल्या. कारण इथं झिनत यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीही सर्वांसमोर ठेवल्या. झिनत यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांचा मुलगाही दिसत आहे. प्रथमदर्शनी ही मंडळी एखादं लग्न किंवा तत्सम सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं लक्षात येत आहे. झिनत यांचं कॅप्शन यावरच शिक्कामोर्तब करताना दिसतंय. 


हेसुद्धा वाचा : RBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम? 


 


'माझ्या मुलांच्या वडिलांसोबतचं माझं लग्न अगदीच छोटेखानी होतं. आम्ही पळून जाऊन सिंगापूरमध्ये लग्न केलं होतं. फक्त दोन साक्षीदार आणि आम्ही दोघं इतकीच मंडळी त्या सोहळ्यात होती. मी कितीही एकांतात रमणारी असले तरीही भारतीय लग्नातील उत्साह आणि एक सुरेख भावना मात्र दुर्लक्षित ठेवता येत नाही. तिथलं जेवण, संगीत, रंगांची फधळण आणि संपूर्ण वातावरण भारावणारं असतं', असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं. 



नातेसंबंधांवरही बोललेल्या झिनत... 


एकिकडे खासगी जीवनामुळं प्रकाशझोतात आलेल्या झिनत अमान यांनी कायमच तरुणाईच्या कलानं काही गोष्टी घेत दुसरीकडे त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचं कायमच पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रिलेशनशिप आणि डेटिंगबाबतही अशाच गोष्टींचा खुलासा केला होता. जिथं त्यांना नातं थेट शारीरिक नसावं, तर त्याआधी एकमेकांना समजून घ्यावं, ओळखावं आणि त्यानंतरच पुढचं पाऊल टाकावं असंही म्हटलं. महिलांनी आर्थिकदृष्ट्या राहावं असा सल्ला देत त्यांनी स्वत:ला प्राधान्यस्थानी ठेवण्याचाच कानमंत्र दिला.