विकीसाठी कतरिना ठरतेय डोकेदुखी? लग्नाच्या काही महिन्यातच संसारात वादाची ठिणगी...
त्यावेळी विकीने कतरिनासोबत होणाऱ्या आपल्या भांडणाबद्दल जाहीरपणे खुलासा केला आहे.
Katrina Kaif and Vicky Kaushal Fight: आपल्या लग्नाबद्दल अनेक दिवस गुप्तता पाळून बसलेले विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतर होणाऱ्या आपल्या भांडणावर मात्र जाहीरपणे बोलताना दिसत आहेत. प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शोमध्ये नुकतीच विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांनी हजेरी लावली होती त्यावेळी विकीने कतरिनासोबत होणाऱ्या आपल्या भांडणाबद्दल जाहीरपणे खुलासा केला आहे.
करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो सध्या भलताच चर्चेत आहे. या शोमध्ये फिल्मी गॉसिप्ससह पर्सनल रिलेशनशिप्स, सेक्स आणि कॉन्ट्रोव्हर्शियल गप्पा गोष्टी होत असतात. तेव्हा साहजिकच विकी आणि सिद्धार्थ मल्होत्रा शोमध्ये आले असताना त्यांनाही करणने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न विचारले आहेत.
विकीला त्याने असाच एक वैयक्तिक प्रश्न विचारला. तेव्हा विकीने आपल्यात आणि कतरिनामध्ये होणाऱ्या वादाबद्दल जाहीर खुलासा केला आहे.
'कॉफी विथ करण'च्या एपिसोडमध्ये करण जोहरने विकी कौशलला विचारले की, ''कतरिना आणि त्याच्यात कधी भांडणं होतात का'', यावर विक्कीने लगेच उत्तर दिले आणि म्हणाला, 'क्लोजेट स्पेस.' क्लोजेट स्पेस म्हणजे काय याचे उत्तर कदाचित तुमच्या पटकन लक्षात येणार नाही परंतु याबद्दल सविस्तर बोलताना विकी पुढे म्हणाला- ''आमच्या खोलीत एक कपाट आहे. पण माझ्यासाठी ते ड्रॉवर आहे, याचे कारण एकाच कपाटाच आम्ही आमचे कपडे ठेवतो. त्यात कतरिनाचेच कपडे जास्त असतात माझे कपडे ठेवायला मला ड्रॉवर एवढीच जागा आहे. यावरून आम्हा दोघांमध्ये भांडणं होत असतात'', असा खुलासा विकीने केला.
आपल्या भांडणासोबत विकीने दोन कौतुकाचेही शब्द कतरिनाबद्दल काढले आहेत. शोमध्ये रॅपिड फायर राउंडमध्ये विकीने सांगितले की कतरिना एक चांगली कुकसुद्धा आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफने धूमधडाक्यात लग्न झाले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर खूप सर्च केले जातात.
लवकरच कतरिना सलमान खानसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. कतरिनाचा 'फोन भूत' हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खत्तर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. विकी कौशल 'साम बहादुर', 'गोविंदा नाम मेरा' आणि 'द अमर अश्वथामा' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.