मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कबीर खान आणि मिनी माथूर यांच्या घरी या दोघांचा रोका सोहळा पार पडला. कतरिनाने कबीर खानसोबत न्यूयॉर्क आणि एक था टायगर सारख्या चित्रपटात काम केलं आहे आणि ती त्याला आपला भाऊ मानते. रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये त्यांच्या लग्नाआधी विकी आणि कतरिनाने नुकतीच एका छोट्या स्वरूपात रोका सेरेमनी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त कुटुंब उपस्थित होतं
वृत्तानुसार, रोकामध्ये फक्त दोघांचं कुटुंबीयच उपस्थित होते. ज्यामध्ये कतरिनाची आई सुजैन, तिची बहीण इसाबेल, विकीचे आई-वडील शाम आणि वीणा कौशल आणि भाऊ सनी उपस्थित होते. याआधी कतरिनाने त्यांच्या एंगेजमेंटच्या अफवांचं सातत्यानं खंडन केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, “तो एक सुंदर रोका समारंभ होता. तेथे दिवे आणि सजावट होती आणि लेहेंग्यात कतरिना खूपच सुंदर दिसत होती. दिवाळीच्या तारखा शुभ असल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. कबीर आणि मिनी जवळजवळ कतरिनाच्या कुटुंबासारखे आहेत."


रॉयल वेडिंगनंतर हे कपल कामावर परतणार आहे
विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. कतरिनाला टायगर 3 चं शूटिंग पुन्हा सुरू करावं लागणार आहे आणि विकी सॅम माणेकशॉच्या बायोपिक सॅम बहादूरवर काम सुरू करणार आहे.


अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही
कॅट आणि विकीने आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मीडियामध्ये लग्नाच्या बातम्या लीक झाल्यामुळे कतरिना चांगलीच नाराज आहे. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप सावध राहिली आहे आणि तिच्या घोषणेपूर्वी या महत्त्वपूर्ण क्षणाचा खुलासा तिला त्रास देत आहे.