मुंबई : विद्या बालनची सिनेसृष्टीतील सगळ्यात सक्सेस अभिनेत्रीमध्ये गणना होते. अभिनेत्री या दिवसांत आपला सिनेमा 'दो और दो प्यार' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचं प्रमोशनला घेवून विद्या बालन मीडियामध्ये सतत समोर येत आहे. या दरम्यान अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री यावेळी रिलेशनशिपमध्ये मिळालेला धोखा देण्याविषयी बोलली आहे. यानंतर अभिनेत्री खूपच तुटली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा प्रेमात विद्याला मिळाला धोका
विद्या बालनने बोलताना सांगितलं की, तिच्यासारखं सौंदर्य असलेलं आणि सक्सेस मिळालेल्या व्यक्तीला कसा धोका दिला जावू शकतो. फिल्म कम्पेनियनसोबत बोलताना अभिनेत्रीने सांगितलं की, ''जेव्हा कोणी तुमची फसवणूक करतं, त्यात तुमचा दोष नाही. हे खऱ्या आयुष्यात त्यांचं वास्तव आहे. त्यावेळी मला हे माहीत नव्हतं. माझं वय खूप कमी होतं. मी काळजीत होते. "माझं हार्टब्रेक झालं होतं आणि मी पुर्णपणे तुटले होते."


चिटर्सबद्दल केलं मोठं वक्तव्य
अभिनेत्रीने पुढे म्हटलं, 'तुम्हाला वाटतं, ओह मी चांगला नाहीये का? हे तुमच्यासोबत कधीच असं होत नसेल, ते नेहमी फसवणूक करणाऱ्याबद्दल असते आणि ती व्यक्ती काय शोधत असते. यामुळे अजूनही समस्या निर्माण होतात.'
 
विद्या बालनचं वर्कफ्रंट
विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या आगामी सिनेमात प्रतिक गांधीसोबत 'दो और दो प्यार में'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा रोलकॉम सिनेमा आहे. हा सिनेमा एक कपलची गोष्ट आहे. ज्यांचं ब्रेकअप होतं. आणि त्या दोघांचं वेगवेगळ्या लोकांसोबत अफेअर असतं. मात्र त्यांना एक सुट्टी पुन्हा एकदा जवळ आणते आणि आता या कपलचा पेच आहे की, त्यांचं कोणासोबत अफेअर आहे. त्यांना सांगायचं कसं. या सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस वाट पाहत होते.