Vijay Deverakonda Confirms Relationship : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन चांगलाच चर्चेत असतो. विजयचं नाव नेहमीच रश्मिका मंदानाशी जोडण्यात येतं. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं नेहमीच म्हटलं जातं. त्या दोघांनी कधी समोरून त्यांच्या नात्यावर दुजोरा दिलेला नाही. पण ते नेहमीच बोलतात की ते दोघं चांगले मित्र आहेत. दरम्यान, आता विजय देवरकोंडानं त्याचं रिलेशनशिप कन्फर्म केलं आहे. अखेर त्यानं त्याच्या नात्यावर मौन सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय देवरकोंडानं नुकतील 'कर्ली टेल्स'ला मुलाखत दिली. या दरम्यान, विजयनं त्याच्या लव्ह लाइफविषयी रिलेशनशिपविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलंय विजयनं सांगितलं की त्याला माहित आहे की कोणावर प्रेम करणं ही भावना कशी असते. त्याशिवाय त्यानं हे देखील सांगितलं की त्याला बिनशर्त प्रेम कसं करतात हे माहित नाही कारण त्याचं प्रेम हे अपेक्षांसोबत येतं. त्यामुळे त्याचं प्रेम हे बिनशर्त नाही असं त्यानं मान्य केलं. सगळं काही ओव्हर रोमॅन्टिक झालं असं त्याला वाटतं. त्याला माहित नाही की बिनशर्त प्रेमाची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे की योग्य. यावेळीच विजय म्हणाला की 'मी 35 वर्षांचा आहे. मी सिंगल असेन असं तुम्हाला वाटतं का?' जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तो आधीपण त्याच्या सह-कलाकारसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तर त्यावर उत्तर देत विजय देवरकोंडानं सांगितलं की 'हो, मी रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे.' 



लग्नाविषयी प्रश्न विचारताच विजय देवरकोंडा म्हणाला, 'महिलांसाठी लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न कधीच कोणाच्या करिअरच्यामध्ये यायला नको. महिलांसाठी लग्न खूप कठीण आहे. मुळात लग्न हे या गोष्टीवर देखील असतं की त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत.' 


हेही वाचा : Free Spain Trip आणि ती सुद्धा कंपनीकडून... 'या' कारणासाठी 1000 कर्मचाऱ्यांना फिरायला घेऊन गेली भारतीय कंपनी


दरम्यान, विजय देवरकोंडाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच तेलगू चित्रपट ‘वीडी12’ आणि ‘जेजीएम-जण गण मन’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो पुरी जगन्नाध यांच्यासोबत देखील एका चित्रपटात दिसणार आहे. विजय आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांच्यासोबत तो दुसऱ्यांदा काम करणार आहे. या आधी विजय देवरकोंडा हा द फॅमिली स्टार या चित्रपटात दिसला होता.