Free Spain Trip आणि ती सुद्धा कंपनीकडून... 'या' कारणासाठी 1000 कर्मचाऱ्यांना फिरायला घेऊन गेली भारतीय कंपनी

Indian Company Giving Free Spain Tour to Employees : ही भारतीय कंपनी 1000 कर्मचाऱ्यांना देते भरपगारी सुट्टी, एक रुपयाही खर्च न करता थेट स्पेन फिरण्याची संधी

दिक्षा पाटील | Updated: Nov 21, 2024, 11:53 AM IST
Free Spain Trip आणि ती सुद्धा कंपनीकडून... 'या' कारणासाठी 1000 कर्मचाऱ्यांना फिरायला घेऊन गेली भारतीय कंपनी title=
(Photo Credit : Social Media)

Indian Company Giving Free Spain Tour to Employees : कोणत्याही व्यक्तीला जेव्हा कोणत्या कंपनीमध्ये नोकरी मिळते तेव्हा त्याला त्यासोबत येणारी कामं आणि मिळणाऱ्या सुविधा देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. अर्थात या सगळ्यात मिळणाऱ्या सुट्ट्या, कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देणारी वागणूक किंवा मग मिळणाऱ्या भेट वस्तू. तर अशा काही कंपन्या आहेत ज्या दसरा- दिवाळीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूप काही भेटवस्तू देताना दिसतात आणि दरवेळी त्याची चर्चा होताना आपण पाहतो. दरम्यान, चेन्नईच्या एका कंपनीनं तिच्या 1000 कर्मचाऱ्यांना अशी भेट वस्तू दिली आहे ज्यामुळे आता अनेक नोकरदार आहेत ज्यांनी त्या कंपनी काम करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. 

चेन्नईमध्ये असलेल्या या कंपनीनं त्यांच्या 1000 कर्मचाऱ्यांना भेट म्हणून स्पेनची एक आठवड्याची ट्रिप गिफ्ट म्हणून किंवा भेट म्हणून दिली आहे. या 1000 कर्मचाऱ्यांचा फिरण्याचा सगळा खर्च हा ती कंपनी करणार आहे. कंपनीला झालेल्या नफ्याचा काही भाग profit-share bonanza अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या अफलातून सहलीसाठी खर्च करणार आहेत. या आधी म्हणजेच गेल्यावर्षी याच कंपनीनं कर्मचाऱ्यांना ऑस्ट्रेलियाची ट्रिप स्पॉन्सर केली होती. 

Casagrand असं या कंपनीचं नाव असून ही कंपनी त्यांच्या या प्रोग्राम विषयी बोलताना म्हणाली की कंपनीच्या यशात ज्या कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं आहे. त्यांच्यासाठी ही ट्रिप स्पॉन्सर करण्यात येते. याविषयी सांगत कंपनीनं म्हटलं की 'गेल्या आर्थिक वर्षी कंपनीनं जे सेल्सचं एक टार्गेट ठरवलं होतं ते पूर्ण करण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी भूमिका बजावली त्या लोकांनी केलेली मेहन आणि सहकार्य दर्शविण्यासाठी हा कार्यक्रम राबला जातो.' कंपनीचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या काम करण्यासाठी एक योग्य ठिकाणी बनवण्यास मदत होते, तर कर्मचारी प्रयत्न करतात त्यांच्या या प्रयत्नांना जर कौतुक केलं तर त्यांनाही आवडतं. 

कर्मचाऱ्यांची निवड कशी होते? 

वेगवेगळ्या डिपार्टमेंट आणि वेगवेगळे रोल असणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड होते. ज्यात कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ लोक सहभागी होतात. कंपनीनं दिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे की ही टूर त्या लोकांसाठी आहे जे खूप मेहनत करतात आणि टीम वर्क करण्यास प्रयत्न करतात आणि असं करत कंपनीचं टार्गेट पूर्ण करतात. 

'इकॉनॉमिक टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, स्पेनमध्ये टूर दरम्यान, कर्मचारी Sagrada Familia आणि Park Guell, तसेच Montjuic Castle सारखी निसर्गरम्य ठिकाणं फिरायला जातील. इथले समुद्र किनारे आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि मनोरंजक ठिकाणांना ते भेट देतील. कंपनीनं सांगितलं की या ट्रिपमुळे भारत आणि दुबईचे कर्मचारी एकत्र येतील आणि त्यांना स्पेनची संस्कृती, ऐतिहासिक ठिकाणी आणि एक वेगळा अनुभव घेण्याची संधी देत आहे. 2013 पासून कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अशा एका ट्रिपचं आयोजन करते. या आधी कंपनीनं सिंगापूर, थायलॅंड, श्रीलंका, दुबई, मलेशिया आणि लंडन.