Master Re-Release: सध्या बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढला आहे. वर्षभरात अनेक चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले आहेत. अशातच आता यामध्ये आणखी एका चित्रपटाच्या नावाची भर पडली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'मास्टर'. तीन वर्षांनंतर विजय सेतुपती आणि थलपथी विजयचा हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय सेतुपती यांनी चित्रपटसृष्टीत 32 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने 'मास्टर' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय सेतुपती यांचा ॲक्शन-थ्रिलर 'मास्टर' चित्रपटाचा पहिला शो हा बेंगळुरूच्या प्रसन्ना थिएटरमध्ये 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ॲक्शनने भरलेला मनोरंजक चित्रपट आहे. आता हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक झाले आहेत. विजय सेतुपती आणि थलपथी विजयचा हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. 



लोकेश कनगराजच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'मास्टर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात एक प्रोफेसर आणि एक भयंकर गुंड यांच्यात लढाई झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये कोविड-19 दरम्यान प्रदर्शित झालेल्या 'मास्टर'ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे बजेट 130 कोटी रुपये होते. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींची कमाई केली होती.


'घिल्ली' चित्रपटाने केली होती प्रचंड कमाई 


2024 मध्ये थलपथी विजयचा 'घिल्ली' हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटाने पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 15 कोटींहून अधिक कोटींची कमाई केली होती. धारणी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला 'घिल्ली' या चित्रपट 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. थलपथी विजयचा हा पहिलाच चित्रपट होता, ज्याने 50 कोटींची कमाई केली होती. 


विजय 'थलपथी 69' मध्ये दिसणार


थलपथी विजय सध्या त्याचा आगामी चित्रपट 'थलपथी 69' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'थलपथी 69' हा विजय थलपथीचा शेवटचा चित्रपट असणार आहे. यानंतर ते राजकारणात प्रवेश करणार आहे.