मुंबई : काही कलाकारांच्या जोडीदारासोबतची त्यांची केमिस्ट्री ही कायमच चर्चेचा विषय ठरते. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रिन असो, कलाकारांची केमिस्ट्री चाहत्यांची कायम कुतूहलाचा विषय ठरते. अशाच एका मोस्ट हॅपनिंग आणि फिटनेस फ्रिक सेलिब्रिटी जोडीनं त्यांचा एक फोटो समोर आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मधील हा फोटो असल्याचं खुद्द या अभिनेत्यानंच कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. 


बाहेर 3 अंश इतकं तापमान, अर्थात कडाक्याची थंडी असताना या अभिनेत्यानं त्याच्या पत्नीसोबत 30 अंश तापमानात हॉट बाथचा आनंद घेतला, कॅप्शन लिहित त्यानं ही आठवण जागवली. 


हा अभिनेता आहे हिंदी चित्रपट सृष्टीचा आयर्न मॅन, अर्थाच मिलिंद सोमण. (Milind Soman Ankita Konwar)


मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता यांच्यामध्ये वयाचं अंतर असतानाही त्यांचं नातं कायमच इतरांना हेवा वाटेल अशाच रुपात सर्वांसमोर येतं. 


मिलिंदनं अंकितासोबतचा हा फोटो पोस्ट करताच त्यावर चाहते आणि फॉलोअर्सनी तशाच कमेंट्सही केल्या. फोटोमध्ये अंकिता बिकीनी लूकमध्ये दिसत आहे, तर मिलिंद नेहमीसारखाच सुरेख दिसत आहे. 



अंकिताच्या नजरेला नजर देत त्यानं अनुभवलेले हे क्षण सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. #CoupleGoals देत आहेत. 


काही आलिशान ठिकाणी सुट्टीसाठी गेलं असता, कशाचीही तमा न बाळगता जोडीदारासोबतचे क्षण अनुभवण्याला बऱ्याचजणांची पसंती असते. मिलिंद आणि अंकिताही त्याच जोडीपैकी एक असं म्हणायला हरकत नाही.