दीपिका पादुकोण किती छान कोंकणी बोलते ऐकलं का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Deepika Padukone Konkani Langauge: दीपिका पदुकोणचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत ती कोंकणी बोलताना दिसत आहे.
Deepika Padukone Konkani Langauge: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच दीपिका आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर सध्या दीपिकाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत ती कोकणी भाषेत बोलताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहून चाहतेही अवाक झाले आहेत. तर, दीपिका बोलत असलेल्या कोकणी भाषेचे थोडंफार मराठीशी साधर्म्य असल्याने चाहत्यांच्या मनात कुतुहलदेखील निर्माण झाले आहे.
एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. यात दीपिकाची मुलाखत सुरू असून सूत्रसंचालक दीपिकाला कोकणी भाषेत प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर दीपिका अस्खलित कोकणी भाषेत बोलताना दिसत आहे. तीचे भाषेवरील प्रभुत्व पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालक तिला कोकणी भाषेत प्रश्न विचारते की, तु कशी आहेस? त्यावर ती कोकणी भाषेत म्हणतेय की, मी बरी आहे. सकाळी उठले, अंघोळ केली, नाश्ता केला, तयार झाली आता इथे आलेय आणि आता मुलाखत देण्यासाठी तयार आहे. दीपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्या, दीपिका मंगळुरची कोकणी भाषा बोलताना दिसतेय. तिचे बालपण कर्नाटकात आणि बंगळुर येथे गेले. तिच्या घरातही कोकणी बोल्ली जाते. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. दीपिका जी भाषा बोलते आहे ती मंगलोरीयन कोंकणी आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे. तर, एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, ही भाषा ऐकताना मराठी जापनीसमध्ये बोलल्याचा भास होतोय.
तर, ज्या अकाउंटवरुन व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहलं आहे की, दीपिकाचा जन्म कोंकणी घरात झाला आहे. तसंच, बेंगळुरु आणि कर्नाटकात तिचं बालपण गेलं आहे. 2011च्या रिपोर्टनुसार, भारतात 26 लाख लोकंच कोंकणी बोलणारे आहेत.
दरम्यान, अलीकडेच दीपिका सिंघम अगेनमध्ये दिसली होती. तर, सप्टेंबरमध्ये दीपिका आणि रणवीर यांच्या घरी गोड परीचा जन्म झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव सांगितलं आहे. त्यांनी मुलीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिकाने लेकीचा एकक फोटो शेअर करत नाव सांगितलं होतं. तसंच, या नावाचा अर्थ प्रार्थना असा होतो, असंही तिने सांगितले आहे.