Viral Video : जेव्हा बॉबी देओल करतो ऐश्वर्या रायची कोरोना टेस्ट
कोरोना, लॉकडाऊन, RT-PCR test हे सगळे शब्द आपल्यापैकी बहुतांश जणांनी पहिल्यांदाच ऐकलेत, वापरले आहेत. पण अभिनेता बॉबी देओलने १९९७ मध्येच अभिनेत्री ऐश्वर्या रायची कोरोनाची आरटी-पीसीआर टेस्ट केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. अर्थात त्या फिल्म आणि गाण्यांमधला संदर्भ वेगळा आहे. पण मीमर्सनी त्याला दिलेला एका फनी टच आहे.
मुंबई : कोरोना, लॉकडाऊन, RT-PCR test हे सगळे शब्द आपल्यापैकी बहुतांश जणांनी पहिल्यांदाच ऐकलेत, वापरले आहेत. पण अभिनेता बॉबी देओलने १९९७ मध्येच अभिनेत्री ऐश्वर्या रायची कोरोनाची आरटी-पीसीआर टेस्ट केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. अर्थात त्या फिल्म आणि गाण्यांमधला संदर्भ वेगळा आहे. पण मीमर्सनी त्याला दिलेला एका फनी टच आहे.
व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये कोरोनासंदर्भातले सर्व नियम बॉबी देओल सांगताना दिसतोय. जसं की एका सीनमध्ये बॉबी म्हणतोय, या गोष्टी मी आगदी स्पष्टपणे पाहू शकतोय, ज्या तुम्हाला दिसत नाहीयेत. दुसऱ्या सीनमध्ये बॉबी म्हणतोय 'ना ना भैय्या कहीं ये बीमारी मुझे ना लग जाए'
काही सीनमध्ये बॉबी मास्क घालतोय, एका रुमला कडी लावतोय, या सगळ्या सीनचे संदर्भ कोरोनाच्या नियमावलीचे दाखवण्यात आले आहेत. पण व्हायरल झालेल्या या व्हीडिओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय. अधिकाधिक हा व्हीडिओ शेअरही केला जात आहे.