विशाल भारद्वाज यांनी मुंबईत खरेदी केलं 19 कोटींचं आलीशान घर!
पाहा विशाल भारद्वाज यांचं घर...
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार आणि लेखक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) हे 'मकबूल', 'ओमकारा' आणि 'हैदर' सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. 2002 मध्ये 'मकडी' चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. आता 'सात खून माफ' आणि 'कमिने' सारख्या चित्रपटांसह बॉलिवूडच्या टॉप दिग्दर्शकांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. अलीकडेच, त्यांनी मुंबईत एक आलिशान घर विकत घेतले आहे, ज्याचे काही फोटो समोर आले आहेत.
हेही वाचा : DDLJ चित्रपटातील काजोलची बहीण आज अशी दिसते, 27 वर्षानंतरही...
विशाल भारद्वाज यांनी गायिका रेखा भारद्वाजसोबत लग्न केले. या कपलला मुलगा असून त्याचं नाव आकाश भारद्वाज आहे. आता आकाशही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 'कुत्ते' या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह आणि राधिका मदान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चं वर्चस्व, कमाईच्या रेसमध्ये 'या' चित्रपटांना टाकलं मागे
विशाल भारद्वाज यांनी मुंबईतील वर्सोवा येथे नवीन घर विकत घेतले आहे. हे एक सी फेसिंग अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, विशालच्या या आलिशान घराची किंमत 19.5 कोटी रुपये आहे. त्याचं घर हे 2,056 स्क्वेअर फूटचं आहे. विशाल यांचा हे अपार्टमेंट 21 व्या मजल्यावर आहे. येथून तुम्हाला मुंबईच्या समुद्राचे अप्रतिम दृश्यही पाहता येते.
हेही वाचा : Khan आणि Bachchan कुटुंबात यंदा दिवाळी सेलिब्रेशन नाही; अखेर मोठं कारण समोर
रिपोर्टनुसार, विशालने 1.17 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरून हे घर खरेदी केले आहे. त्यांना या आलिशान घरासह तीन पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. यासोबतच त्यांना स्विमिंग पूल, लिफ्ट, क्लब हाऊस, पार्क, कम्युनिटी सेंटर आणि जिमची सुविधाही मिळाली आहे.