Khan आणि Bachchan कुटुंबात यंदा दिवाळी सेलिब्रेशन नाही; अखेर मोठं कारण समोर

दरवर्षी सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टी का दिसणार नाही...

Updated: Oct 20, 2022, 10:45 AM IST
Khan आणि Bachchan कुटुंबात यंदा दिवाळी सेलिब्रेशन नाही; अखेर मोठं कारण समोर title=

मुंबई : अलीकडेच बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana) त्याच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स स्पॉट झाले होते. तर दुसरीकडे सर्वांच्या नजरा या बच्चन आणि खान यांच्या दिवाळी पार्टीकडे (Diwali 2022) लागल्या आहेत. पण यावेळी अशी बातमी समोर येत आहे की यावेळी बच्चन आणि खान कुटुंबानं दिवाळी पार्टी रद्द केली आहे. तर साधेपणानं जवळच्या मित्रांसोबत सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी आल्यानंतर चाहते थोडे निराश झाले आहेत.

खरंतर, बच्चन कुटुंब असो, करण जोहर (Karan Johar) असो किंवा शाहरुख खान (Shahrukh Khan) असो, त्यांच्या घरी दरवर्षी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यांची दिवाळी पार्टी ही सगळ्यांच्या लक्षात राहणारी असते कारण त्यांच्या पार्टीत संपूर्ण बॉलिवूड सामील होतं. त्यामुळेच दरवर्षी दिवाळीला सर्वांच्या नजरा त्यांच्या सेलिब्रेशनवर खिळलेल्या असतात, मात्र यावेळी त्यांनी दिवाळी पार्टीचं मोठं सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर येत आहे. यामागे वेगवेगळी कारणं असल्याचं समोर येत आहे. करणच्या घरी रेनोवेशनचं काम सुरु आहे. त्यामुळे तो काही ठरावीक लोकांना घरी बोलावून दिवाळी साजरा करणार असल्याचे म्हटले जाते. तर दुसरीकडे शाहरुख खान आणि बच्चन कुटुंबीयांनी कोरोनामुळे हा निर्णय घेतला आहे. (diwali 2022 amitabh bachchan shahrukh khan karan johar not to host diwali party this year know why) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुख-अमिताभ यांनी ग्रँड दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर मनीष मल्होत्रा, शिल्पा शेट्टी यावेळी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करण्याचा विचार करत आहेत. यावेळी त्यांच्या घरी सेलेब्सचा मेळावा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. यावेळी आयुष्मान खुरानानं दिवाळीआधी पार्टी देऊन सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींचा मेळावा पाहायला मिळाला. त्याचवेळी अक्षय कुमारही कमी लोकांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याची बातमी आहे.