शरद पवारांच्या `त्या` वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीची खोचक टीका, म्हणाला...
वाचा काय म्हणाला विवेक अग्निहोत्री...
मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) नेहमीच त्याचं मत मांडताना दिसतो. बऱ्याचवेळा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वादही होतात. नुकतीच विवेक अग्निहोत्रीनं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP chief Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावर टोला लगावत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : हात जोडून प्रार्थन करेन...; कथित MMS लीक होण्यावर अभिनेत्री संतापली!
शरद पवार यांनी नुकतेच बॉलिवूडमधील मुस्लिम समाजाच्या योगदानावर भाष्य केले. यावर विवेकनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार नागपुरात एका कार्यक्रमाला पोहोचले होते. त्यादरम्यान त्यांनी कलाविश्वावर एक वक्तव्य केले. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले की, 'जर आपण आजच्या तारखेत कला, कविता आणि लेखन याबद्दल बोललो तर अल्पसंख्याकांमध्ये अधिक क्षमता आहे आणि ते त्यात अधिक योगदान देऊ शकतात. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे? मुस्लिम अल्पसंख्याकांचे सर्वाधिक योगदान आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.'
आणखी वाचा : 'या' अभिनेत्रींनी ऑनस्क्रीन बाप - बेटा दोघांसोबत केला रोमान्स, यादीतील चौथ्या क्रमांकाचं नाव वाचून व्हाल आवाक
शरद पवारांचं हे वक्तव्य विवेक अग्निहोत्रीला आवडलं नाही आणि त्यानं यावर प्रतिक्रिया देत म्हणाला की, 'मे गॉड गिव्ह हिम जन्नत...' पुढे विवेकनं पोस्ट शेअर करत शरद पवारांवर टीका केली आहे. विवेक नक्की काय म्हणाला तुम्हीच पाहा...
आणखी वाचा : Gauri Khan च्या भावानं Shahrukh Khan वर रोखली बंदूक!
आणखी वाचा : करण जोहरबाबत शाहरुख खानचं मोठ वक्तव्य; 'होय, आम्ही एकत्र...'
विवेक अग्निहोत्रीनं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याचे ट्वीट्स हे नेहमीच चर्चेत असतात आणि त्यामुळे तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतो. आता त्याच्या या नवीन ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.