Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्यानं त्याच्या करिअरची सुरुवात राम गोपाल वर्माच्या कंपनीतून केली होती. या चित्रपटात तो अजय देवगण आणि मोहनलाल यांच्यासारख्या कलाकारांसोबत दिसला होता. या चित्रपटानंतर त्यानं अनेक चित्रपट केले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याशिवाय त्याच्याही मनात सुशांत सिंह राजपुतप्रमाणे विचार आला होता याविषयी देखील सांगितलं.


सुशांतसारखा विचार करत होता विवेक ओबेरॉय!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवेक ओबेरॉयनं सुशांत सिंग राजपूतच्या निधनावर त्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानं शेवटच्या क्षणांना आठवत विवेक ओबेरॉय म्हणाला की "त्याच्या अंतिम संस्कारमध्ये 20 लोक होते आणि त्यावेळी पावसात त्याच्या वडिलांना रडताना पाहिलं. विवेकनं म्हटलं की सुशांतला त्याच्या शेवटच्या क्षणी पाहिल्यानंतर त्याच्या मनात एकच गोष्ट आली होती की जर सुशांतनं आता या सगळ्या लोकांना पाहिलं असतं तर त्याला जाणवलं असतं की त्यांची काय अवस्था आहे. विवेकनं सांगितलं की त्यानं त्या लोकांविषयी विचार केला, जे त्याच्यावर प्रेम करतात. तो स्वत: ला भाग्यवान समजतो की त्याच्याकडे घर आहे, ज्यानं त्याला सांभाळलं आहे."


विवेक ओबेरॉयनं सांगितलं की "एक अशी वेळ आली होती जेव्हा तो सुशांतसारखा विचार करु लागला होता. त्या दिवसांना आठवून तो म्हणाला की तो त्याच्या आईकडे गेला आणि जमिनीवर बसून एखाद्या लहाणमुला प्रमाणे रडू लागला होता. तो विचार करत होता की त्याच्यासोबत असं का झालं? तो 40 मिनिटांपर्यंत फक्त रडत होता आणि मग त्याच्या आईनं म्हटलं की जेव्हा तू इतके अवॉर्ड्स जिंकत होता, लोकप्रियता मिळत होती आणि सगळे प्रेम करत होते तेव्हा तू प्रश्न केलास की फक्त तूचं का? तर त्यानं सांगितलं की तो देखील सुशांतप्रमाणे अंधाऱ्याच्या रस्त्यावर होता आणि सुशांतनं केलं त्याचा तो विचार करू लागला होता."  


हेही वाचा : 'मी फक्त त्याचा जीव घ्यायचं बाकी होतं'; स्विगी डिलेव्हरी बॉयवर एवढा का संतापला अभिनेता?


दरम्यान, विवेक ओबेरॉयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यात तो शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसला होता. तर ही सीरिज तुम्हाला प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.