मुंबई : सेलिब्रिटी, विशेषत: कलाकार मंडळी हे त्यांच्या फिटनेसाठीही ओळखले जातात. शारीरिक सुदृढतेकडे कायमच गांभीर्यानं पाहणारी ही मंडळी व्यायाम करणं कधीही चुकवत नाहीत. बी- टाऊन अभिनेत्रीही सुडौल बांध्यासाठी आणि फिट राहण्यासाठी व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व देतात. अशाच एका अभिनेत्रीचा फिटनेस पाहून Man Vs wild फेम बेअर ग्रिल्सही भारावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रीनं पोस्ट केलेल्या व्हिडीओला लाईक करत, 'नेव्हर गिव अप' म्हणजेच कधीही हार पत्करु नकोस, अशी कमेंट बेअरनं केली आहे. त्याला आपल्या फिटनेसनं भुरळ पाडणारी ही अभिनेत्री आहे उर्वशी रौतेला. 


Body shaming वर प्रसिद्ध सिंगरकडून धक्कादायक खुलासा, माझ्यावरही...


उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जिममझ्ये व्यायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं आपल्या वडिलांचा एक संदेशही सर्वांपर्यंत पोहोचवला. तुम्हाला आनंद देईल अशी एकतरी गोष्ट दिवसातून एकदा करा, आनंदावर किंमत लावूच शकत नाही तुम्ही कारण ते किंमतीत मोजताच येत नाही, असंही तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं. 




अतिशय सुरेख असा संदेश देत उर्वशीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला आणि त्यावर लाखोच्या संख्येनं लाईक्स आले. तिचा हा व्हिडीओ पाहून त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधणारी कमेंट ठरली ती म्हणजे बेअर ग्रिल्स याची. त्यानं उर्वशीला दिलेलं प्रोत्साहन पाहता अर्थातच तिच्यासाठी ही मोठी बाब असणार यात शंका नाही.