`Chamkila` चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
Chamkila movie and Amitabh Bachchan Connection : अमर सिंग चमकीला यांचा आणि अमिताभ बच्चन यांचं खास कनेक्शन आहे. त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट...
Chamkila movie and Amitabh Bachchan Connection : लोकप्रिय पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्रा यांचा 'चमकीला' या चित्रपटाची जोरदार वाह वाह होतेय. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर काही वेळातच सर्वत्र त्यांची चर्चा होतेय. अमर सिंग चमकीला यांच्या आयुष्यावरील हा चित्रपट आहे. पंजाबी संगीतात मोठं नाव असलेल्या चमकिलाला या चित्रपटामुळे पुन्हा एकदा ओळख मिळाली. (What is the connection between Chamkila movie and Amitabh Bachchan)
'Chamkila' चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
या चित्रपटाचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी खास कनेक्शन आहे. मीडिया रिपोर्टनुसार 80 व्या दशकात जेव्हा अमर सिंग चमकीला आपलं नाव कमवण्यासाठी धडपड करत होते. तेव्हा अमिताभ बच्चन हे सुपरस्टार होते. त्यामुळे या चित्रपटात अभिनेत्याची हेअरस्टाइलपासून अनेक सिनमध्ये अमिताभ बच्चन यांची झलक दिसतं. या चित्रपटातील सलूनमध्ये चमकीला केस कापण्यासाठी जातो तेव्हा त्या सलूनच्या भिंतीवर अमिताभ यांचा फोटो लावलेल्या दिसून येतो.
या चित्रपटातील दुसऱ्या एका दृश्यात चमकीला यांच्या दुसऱ्या लग्नामुळे गावात खळबळ माजली. त्यानंतर पहिल्या पत्नीच्या कुटुंबाने गावात पंचायत बोलवली. सरपंचाने दुसरं लग्न बेकायदेशीर असल्याच म्हटलं. त्यावेळी चमकीला आपल्या वडिलांना म्हणतो की, 'चिंता करु नका आजकाल तुमचा मुलगा बच्चन आहे.'
याच चित्रपटात अजून एक दृश्यांत चमकीला कॅनडामधील गाण्याचा परफॉर्मेंस देण्यासाठी जातो. त्यावेळी अमिताभ बच्चनचे मोठे पोस्टर कॅनडामध्ये दिसतो. या चित्रपटात चमकीलाने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एक रेकॉर्ड तोडतानाचा उल्लेख करण्यात आलाय. या चित्रपटात चमकीला कॅनडामधील त्याच हॉलमध्ये परफॉर्मेंससाठी जातो. जिथे अमिताभ बच्चन येऊन गेले आहेत.
चमकीलाच्या परफॉर्मेंसनंतर आयोजक चमकीला भेटतात आणि सांगतात की, ज्यावेळी या हॉलमध्ये अमिताभ बच्चन आले होते तेव्हा त्यांना 136 खुर्च्या जास्तीच्या लावायला लागल्या होत्या. तर चमकीलाच्या परफॉर्मेंससाठी आयोजकांना 1 हजार 24 खुर्च्या त्यांना जास्तीच्या लावायला लागल्या होत्या.
आयोजकांनी हे सांगितल्यावर चमकीला खूष व्हायला हव्याला पाहिजे होता. मात्र तो उदास दिसतो, कारण त्याचे बालपणीचे स्वप्न आता त्याच्या स्वत: च्या स्टारडमच्या तुलनेत फिके पडल्याच त्याला जाणवतं. त्या काळात अमिताभ बच्चन यांच्या मोठा चाहत्या वर्ग होता. त्यातील एक नाव चमकीला हे देखील होते.