Mugdha-Prathmesh Viral Video : झी मराठीच्या 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्समधील बालकलाकार म्हणून लोकप्रिय झालेले गायक मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लवकरच लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाची बातमी सगळ्यांसाठीच सुखद धक्का होता. या दोघांच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांच मन जिंकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र आता हे दोघं आजकालच्या पिढीला लग्नाची भीती का वाटते? यावर अतिशय मोकळेपणाने बोलत आहेत.  मुग्धा आणि प्रथमेश हे अनुक्रमे 23 आणि 29 असे आहेत. अशावेळी मुग्धा एवढ्या कमी वयात लग्न का करतेय? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला. या सगळ्यावर मुग्धाने या व्हिडीओत भाष्य केलंय. 



मुग्धाला एवढ्या कमी वयात लग्न करण्याचं दडपण आलंय? याप्रश्नावर मोकळेपणाने उत्तर दिलंय. मुली जोडीदाराला मुठीत का ठेवतात? या ना अनेक प्रश्नांवर मुग्धाने उत्तर दिलंय. या मुलाखतीत प्रथमेशने देखील आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. 


मुग्धा-प्रथमेश 'वैचारिक किडा' या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मुलाखत दिली. यामध्ये दोघांनी “लग्नाचं योग्य वय कोणतं?” याविषयावर दोघांनी आपलं मत मांडल आहे. यामध्ये प्रथमेश मुग्धाला विचारतो, “आताचा एक ट्रेंड असा आहे की, मागच्या काही वर्षांमध्ये अठ्ठावीस-तिशीपर्यंत लग्नाचा विचार केला जात नाही किंवा आरामात लग्न करूया अशी भावना असते याबद्दल तुला काय वाटतं?” या ना अनेक प्रश्नावर मुग्धा-प्रथमेश मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. 



“मला वाटतं आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून लग्नाचं वय ठरवलं आहे. अर्थात पूर्वीच्या काळात लग्न करताना मुलाच्या आणि मुलीच्या वयात जे अंतर असायचं ते १०० टक्के चुकीचं आहे. पण, ठराविक वयात मुलाचं-मुलीचं लग्न झालं पाहिजे यामागे काहीतरी लॉजिक आहे. विशिष्ट वयात लग्न का झालं पाहिजे? यामागची कारण तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहिती आहेत. फक्त आपली जनरेशन ती कारणं स्वीकारत नाही. कारण, त्यांना मिळणारं स्वातंत्र्य कायमचं हवं असतं. कोणतीही जबाबदारी नको असते. स्वतःची स्पेस सोडून तडजोड करायची नसते. अशावेळी विरोधाला विरोध करणे मला पटत नाही. योग्य वयात योग्य गोष्टी झाल्या पाहिजेत, या मताची मुग्धा असल्याचं सांगते.