मुंबई : 'लगान' सिनेमाला 20 वर्षे झाली आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar) यांनी केलं आहे. या सिनेमाकरता आशुतोष आणि आमिर खानला ऑस्करच्या 'बेस्ट फॉरेन लँग्वेज सिनेमा' करता नॉमिनेशन मिळालं. मात्र इतर पुरस्कार या सिनेमाने पटकावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमा दरम्यानच आमिर खान आणि किरण राव एकमेकांजवळ आले. या सिनेमाला किरणने असिस्ट केलं आहे. आमिर खानच्या म्हणण्यानुसार, या सिनेमाशी संबंधित अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत. मात्र आमिर खानकरता सर्वात खास क्षण होता जेव्हा पत्नी रीनाचं पत्र आलं होतं. 



आमिर खानने दिलेल्या माहितीनुसार, एका रात्री मी रीनाला सांगितलं होतं की, तू हा सिनेमा प्रोड्युस करते. तेव्हा रीनाने याला नकार दिला होता. कारण तिला याबाबत काहीच माहित नव्हतं. आणि हे खरंच होतं. मात्र आमिर खानकरता रीनाने प्रोडक्शनची जबाबदारी सांभळली. याकरता रिनाने खासकरून तयारी केली होती. रीना या प्रोजेक्ट करता सुभाष घईला भेटली होती. 


आमिरकरता रीनाने केलं होतं हे काम 


आमिरने दिलेल्या माहितीनुसार, रीनाने खूप मेहनतकरून मेकिंगच्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. ती खूप स्ट्रिक्ट प्रोड्यूसर होती. ती कुणाचं काही चुकलं तर सगळ्यांना ओरडत असे. अगदी मला पण. सिनेमा पूर्ण झाल्यावर रीनाने आमिर खानला एक पत्र पाठवलं. यामध्ये तिने लिहिलं होतं की, कठिण प्रसंगात सिनेमा तयार केल्यामुळे सगळ्यांचे आभार मानले आहेत. सगळ्यांना ओरडत असे. 



सिनेमा पूर्ण होताच रीनाने एक पत्र लिहिलं आहे. मला आता हे पूर्ण पत्र लक्षात नाही. 'मला माफ कर. या कठिण प्रसंगात सिनेमा पूर्ण करण्यासाठी'. तिने सगळ्यांचं कौतुक केलं आहे. आमिर खान म्हणतो की,आम्ही सगळे या क्षेत्रातील होतो. पण रीना या बॅकग्राऊंडमधील नव्हती. ते पत्र वाचून मी खूप रडलो होतो अशी कबुली स्वतः आमिर खानने केली होती.