Salman Khan : 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये येणारे स्पर्धक वेगवेगळ्या प्रकराचे खुलासे करताना दिसतात. दरम्यान, 'बिग बॉस 10' मध्ये शोमध्ये स्पर्धक म्हणून आलेले स्वामी त्यांच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत आले होते. या शोमध्ये त्यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यांच्या विषयी एक दावा केला की त्याला AIDS असून त्यानं अजुन लग्न का केलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणखी वाचा : King Cobra ला Kiss करण्यासाठी मुलीनं केलं असं काही, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का


'बिग बॉस 10' मधून बाहेर पडल्यानंतर स्वामी ओम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. स्वामी ओम यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी कानशिलेत लगावली होती. बिग बॉसच्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर. सलमान खाननं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. याचं कारण म्हणजे स्वामी ओम इतर स्पर्धकांना चांगली वागणूक देत नव्हते. त्यामुळे सलमाननं त्यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. 


आणखी वाचा : आमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...


 



शोमधून बाहेर येताच स्वामी ओम यांनी सलमानवर अनेक आरोप केले. यातील एक आरोप म्हणजे, सलमान AIDS सारख्या धोकादायक आजाराशी झुंज देत आहे आणि त्यामुळे तो लग्न करत नाही. सलमानवला लंडनमध्ये एक मुलगीही आहे. 


आणखी वाचा : कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा


रिपोर्ट्सनुसार, स्वामी ओम म्हणाले होते की, 'प्रत्येक नवरात्रीला मी 1008 मुलींचे पाय धुवून पूजा करतो आणि त्या चरणामृताने मी एड्स आणि कॅन्सरसारखे आजार बरे करतो. मी बिग बॉसला सांगितले की, तुमच्या सलमान खानलाही एड्स आहे, तुम्ही त्याची तपासणी करा, तुम्हाला 3 मिनिटांत रिपोर्ट मिळेल.'


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


स्वामी पुढे म्हणाले होते की, 'म्हणूनच तो लग्न करत नाहीये आणि इतकंच नाही तर त्याला एक मुलगी असून दती लंडनमध्ये आहे. तो लपवतोय, ही वेगळी बाब आहे. दुसऱ्या एका मुलाखतीत त्यांनी सलमान हा आयएसआय एजंट असून हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, मसूद अझहर आणि अबू सालेम यांसारख्या लोकांशी त्याची मैत्री असल्याचा आरोपही केला होता.


स्वामी ओम गेल्या वर्षी आजारी होते आणि त्यांना पॅरालिटिक अटॅक आला होता. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांनंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि 3 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांचे निधन झाले.