दारुच्या नशेत मध्यरात्री शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या व्यक्तीची अशी अवस्था
कपिल शर्माने एका कार्यक्रमात शाहरूख खानसोबतचा एक अनुभव सांगितला. जो ऐकून कदाचित तुम्हाला हसू आवतरता येणार नाही
मुंबईः कॉमेडीयन कपिल शर्माने एका कार्यक्रमात शाहरूख खानसोबतचा एक अनुभव सांगितला. जो ऐकून कदाचित तुम्हाला हसू आवतरता येणार नाही. कपिल शर्माने स्वतः नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार्या स्टँड-अप स्पेशल शो 'I am not done yet' मध्ये ही संपूर्ण घटना सांगितली.
कपिल शर्माने सांगितलं की, त्याची एक चुलत बहीण मुंबईत आली होती आणि तिनं कपिलकडे शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. कपिल शर्माच्या म्हणण्यानुसार, त्या रात्री तो खूप नशेत होता आणि तरी त्याने बहिणीची इच्छा मान्य केली आणि तो रात्री शाहरुखच्या घराबाहेर पोहोचला तेव्हा तिथे पार्टी सुरू होती.
कपिल म्हणतो, 'मी माझ्या ड्रायव्हरला गाडी आत घेण्यास सांगितले, तेव्हा ड्रायव्हरने गाडी बंगल्यात घेतली आणि सुरक्षा रक्षकांनीही आम्हाला जाऊ दिले कारण त्यांना वाटले की मलाही पार्टीला तिथे बोलावलं असावं'. कपिल पुढे सांगतो की, 'मला आत जाताच माझी चूक समजली, पण तोपर्यंत शाहरुख खानचा मॅनेजर आम्हाला आत घेऊन गेला'.
'मी घरात प्रवेश करताच मला गौरी तिच्या तीन मैत्रिणींसोबत बसलेली दिसली, मी तिला हॅलो म्हणालो, मग तिने हाताने इशारा करून सांगितले की, शाहरुख खान आत आहे'.
कपिल पुढे सांगतो की, 'जेव्हा मी आत गेलो, तेव्हा शाहरुखला त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये नाचताना पाहून मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो, सॉरी, माझ्या बहिणीला तुझं घर पाहयचं होतं, घर उघडं होतं त्यामुळे मी आत आलो, हे ऐकून शाहरुख म्हणाला - 'माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडा असेल तर तुम्ही तिथेही येऊ शकतोस.. कपिल सांगतो की, ही घटना रात्री 3 वाजताची आहे, त्यानंतर सर्वांनी शाहरुख खानसोबत खूप एन्जॉय केला.