Ashok Saraf Maharashtra Bhushan: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली आहेत. अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान यानिमित्ताने अशोक सराफ यांच्या आयुष्यातील एका घटनेबद्दल जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक सराफ यांच्यावर एकदा जमाव धावून गेला होता. नाना पाटेकर यांनी त्यावेळी अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता. नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलं असतं असं अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. जाणून घ्या हा नेमका किस्सा काय आहे.


एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी तो प्रसंग उलगडताना सांगितलं होतं की, "नाटक रद्द झाल्याने लोक मारण्यासाठी माझ्या मागे धावले होते. त्यावेळी नाना पाटेकरने मला तेथून अक्षरश: पळवलं होतं."थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारुन आम्ही पळालो. मला घेऊन तो अक्षरश: धावत होता". 


ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर


 


"ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्याने थांबवली. तो स्वत: चालवू लागला आणि मला घेऊन गेला. नाना पाटेकरने माझा जीव वाचवला आहे. नाही तर लोकांनी मला मारला असता,” अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितली होती.


“नाना पाटेकर आणि माझा सहवास फक्त आठ महिन्यांचा होता. आम्ही एकत्र काम केलं होतं. एक दोन चित्रपट आम्ही सोबत केले. पण त्याला सहवास म्हणता येणार नाही. पण हमीदाबाईची कोठी नाटकाच्या निमित्ताने आम्ही आठ महिने एकत्र होतो. हमीदाबाईची कोठीदरम्यान त्याची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली जी आजपर्यंत आहे. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकरही ते मानणारा आहे त्यामुळे जास्त आहे. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा स्वभाव आठवला. तो खडूस वाटतो, पण तसा तो नाही. तो सरळ आहे, फक्त स्पष्टवक्ता आहे. पण तो त्याचा गुणच आहे. मैत्रीला एकदम छान माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात सांगितलं तर तो केव्हाही मदतीला धावून येऊ शकतो. अंगावरचे कपडेही काढून देईल असा माणूस आहे,” असं सांगत अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतची मैत्री उलगडली होती.