Amitabh Bachchan Property : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. वयाच्या 81 व्या वर्षी देखील त्यांचा फिटनेस हा लोकांना आश्चर्य होईल असा आहे. त्याशिवाय अमिताभ हे काही वेगळ्या कारणामुळेच सोशल मीडियावर चर्चेत असतात. या सगळ्यात अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत होते. आता या सगळ्यात अमिताभ बच्चन यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी ते त्यांच्या निधनानंतर त्यांची संपत्तीचे कसे वाटे पडतील याविषयी बोलताना दिसतात. ते यावेळी त्यांच्या मृत्यूपत्राचा संदर्भ देत म्हणाले की लेक श्वेता आणि मुलगा अभिषेक यांच्यात समान वाटे होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांनी 2011 मध्ये रेडिफला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की 'मी एक गोष्ट ठरवली होती की मी त्यांच्यात कोणताही भेदभाव करणार नाही. जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्याकडे जे काही असेल ते माझी लेक आणि माझ्या मुलामध्ये समान वाटलं जाईल, कोणताही भेदभाव नाही.'



अमिताभ यांनी हे देखील सांगितलं की त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यासोबत मिळून त्यांनी हे सगळं ठरवलं होतं. याविषयी सांगत अमिताभ म्हणाले, 'जया आणि मी खूप आधीच हे ठरवलं होतं. प्रत्येक व्यक्ती म्हणतं ही मुलगी ही परक्यांची असते, ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाते. पण माझ्या नजरेत ती माझी लेक आहे. तिच्याकडे तेच अधिकार आहेत, जे अभिषेककडे आहेत.'


दरम्यान, अमिताभ यांनी गेल्यावर्षी त्यांचा 'प्रतीक्षा' हा बंगला श्वेता बच्चन नंदाला भेट केला. त्यावेळी त्या बंगल्याची किंमत ही 50 कोटी असल्याचे म्हटले जाते. तर रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड सुपरस्टारच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ही 1600 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. 


हेही वाचा : कोण आहे Iman Esmail? पाकिस्तानी मिलिट्री ऑफिसरची लेक होणार प्रभासची अभिनेत्री! 'या' चित्रपटातून करणार पदार्पण


दरम्यान, याच मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत त्यांचं नातं कसं आहे याविषयी देखील सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की अभिषेकला ते मित्राप्रमाणे मानतात. याविषयी सांगत ते म्हणाले की, 'मी अभिषेकच्या जन्माच्या आधीच ठरवलं होतं की जर मला मुलगा झाला तर तो माझा मुलगा नाही तर मित्र असेल. ज्या दिवशी त्यानं माझे बूट घातलं, त्याच दिवशी तो माझा मित्र झाला. त्यामुळे आता मी त्याला एक मित्र मानतो. मी त्याला एक मुलगा म्हणून फार कमी पाहतो. मी एका वडिलाप्रमाणे त्याची चिंता करतो, एका वडील म्हणून त्याची काळजी घेतो, वडील म्हणून मी त्याला सल्ला देतो, पण जेव्हा मी त्याच्याशी बोलतो, तेव्हा आम्ही मित्रांप्रमाणे बोलतो.'