कोण आहे Iman Esmail? पाकिस्तानी मिलिट्री ऑफिसरची लेक होणार प्रभासची अभिनेत्री! 'या' चित्रपटातून करणार पदार्पण

Who is Iman Esmail? Debut With Prabhas : पाकिस्तानी मिलिट्री ऑफिसरची लेक प्रभाससोबत करणार 'या' चित्रपटातून डेब्यू

दिक्षा पाटील | Updated: Sep 5, 2024, 11:28 AM IST
कोण आहे Iman Esmail? पाकिस्तानी मिलिट्री ऑफिसरची लेक होणार प्रभासची अभिनेत्री! 'या' चित्रपटातून करणार पदार्पण title=
(Photo Credit : Social Media)

Who is Iman Esmail? Debut With Prabhas : 'कल्कि 2898 एडी' नंतर आता दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण त्यापेक्षा जास्त चर्चा ही त्याच्या नवा अभिनेत्रीची आहे. प्रभासच्या चाहत्यांना तिच्याविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. ती कोण आहे ती काय करते या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांना जाणून घ्यायची आहेत. आज आपण प्रभासच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या अभिनेत्रीचं नाव इमान इस्माइल उर्फ इमानवी आहे. सोशल मीडियावर इमानला नॅशनल क्रश असं म्हणत आहेत. जर इमान इस्माइलचं नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल तर चला तिच्या विषयी काही न माहित असलेल्या गोष्टी जाणून घेऊया... 

इमान इस्माइल उर्फ इमानवी लवकरच दिग्दर्शक हनु राघवपुडीचा आगामी चित्रपट 'फौजी' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात इमानवी ही दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हैदराबादच्या एका भव्य पूजा समारंभात चित्रपटाच्या कामाची सुरुवात झाली. रिपोर्ट्सनुसार, हा एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. हा चित्रपट सुभाष चंद्र बोस यांच्यावर आधारीत असेल आणि इमानवी या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटात तिचा डेब्यू करणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

इमान इस्माइल उर्फ इमानवी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असण्यासोबत डान्सर आणि कोरियोग्राफर देखील आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. तिच्या यूट्यूब चॅनलवर 1.8 मिलियन सब्सक्रायबर आहेत आणि इन्स्टाग्रावर 9 लाख फॉलोवर्स आहेत. इमानवी एक कंटेन्ट क्रिएटर आहे आणि ती नेहमीच तिच्या डान्सचे रील्स सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता इमानवी लवकरच एक अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करणार आहे. 

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्ट्सनुसार,  इमान इस्माइलचा जन्म 20 ऑक्टोबर 1995 रोजी झाला. इमान ही कराचीची राहणारी आहे आणि एक पाकिस्तानी मिलिट्री ऑफिसरची लेक आहे. तिचे वजील इकबाल इस्माइल खान, सेना निवृत्त आहेत. इमानवीचा जन्म दिल्लीत झाला होता. तर आठ वर्षांची असताना ती तिच्या कुटुंबासोबत कॅलिफोर्नियाला गेली. लोकं तिला इमानवीच्या नावानं ओळखतात. इमानवी इस्माइलचं पूर्ण नाव इमान इकबाल इस्माइल आहे. तिनं करिअरच्या सुरुवातीला इलियास कुरेशीची शॉट फिल्म 'बीइंग साराह' मधून केली होती. 

गेल्यावर्षई 2023 मध्ये 'एनिमी' तील गाणं 'तुम तुम' वर तिनं डान्स केला होता. त्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. त्यासोबत तिनं अनेक लोकप्रिय कंटेन्ट क्रिएटर्ससोबत काम केलं. MBA चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिनं तिचं यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. सोशल मीडियावर तिले लाखो फॉलोवर्स आहेत, जे तिच्या सुंदरतेसोबत तिच्या डान्सचे देखील चाहते आहेत. 2024 च्या सुरुवातीला डान्सर ईशानी पटेलशी बोलत असताना इमानवीनं खुलासा केला की तिनं कधीच डान्ससाठी कोणती ट्रेनिंग घेतली नाही.   

हेही वाचा : KBC 16 : खिशात 260 रुपये घेऊन मुंबईत आलेला स्पर्धक 1 कोटींच्या प्रश्नावर मारणार तुक्का? Video पाहाच

इमानवीनं पुढे सांगितलं की जो काही डान्स ती करते ते सगळं ती दुसऱ्यांना पाहून शिकली आहे. इमानवीनं सांगितलं की तिच्या आईनं लहानपणापासून रेखा, माधुरी दीक्षित आणि वैजयंतीमाला यांसारख्या सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींचे चित्रपट दाखवले. तिची आई कायम म्हणायची की त्यांचे हाव-भाव बघ, ती कशी चालते. त्यातून इमानवी खूप काही शिकली आणि आता तिचे चाहते तिच्या डेब्यूला घेऊन खूप उत्साही आहेत.