मुंबई : झगमगत्या विश्वात असे अनेक जोडपे आहेत, जे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत आसतात. अशा जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन. ऐश्वर्या आणि अभिषेक कयम एकत्र दिसतात. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. लग्नाच्या 14 वर्षानंतरही ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांमधील बॉन्डिंग खूपच मजबूत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत त्यांच्यात कोणतेही गंभीर भांडण झाले नाही, परंतु अनेक वेळा त्यांच्यात भांडण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण त्यांच्या नात्याबद्दल नकारात्मक चर्चा कधीही रंगल्या नाहीत. एका मुलाखतीत दोघांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. दोघांनीही हे सत्य स्वीकारले की सामान्य जोडप्याप्रमाणेच त्यांच्यातही अनेक भांडणं होत असतात. 



ऐश्वर्याने असेही सांगितले की, ती अभिषेक बच्चनसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून खूप भांडायची. ही मारामारी नसून एक प्रकारचे मतभेद आहेत. भांडणं नसती तर त्यांचे वैवाहिक जीवन खूप कंटाळवाणे झाले असते. एक मजेशीर गोष्ट सांगताना अभिषेकने मोठं सत्य उघड केलं


अभिषेकने सांगितले की, दोघांनी मिळून ठरवले होते की, भांडण झालं की झोपायचं नाही. म्हणूनच तो रोज रात्री झोपण्यापूर्वी माफी ऐश्वर्याची मागायचा. पुढे अभिषेक म्हणाला की, स्त्रिया आपली चूक कधीचं मान्य करत नाहीत, त्यामुळे अनेक भाडणांमध्ये पुरूषाला माफी आणि माघार घ्यावी लागते...