नवी दिल्ली : अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या एका इराणी सिनेमात काम करत आहे. डेविल्स डॉटर या सिनेमात काम करण्याचा ती आनंद घेत आहे आणि तिच्यासाठी हा अनुभव अतिशय खास आहे. ईशा एक महिन्यापासून मुंबईत शूटिंग करत आहे. 


यासाठी ईशा स्वतःला समजते लकी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा म्हणते डेविल्स डॉटर या सिनेमात दिग्दर्शक घोरबन मोहम्मदपौर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी अतिशय सन्मानित वाट आहे. यापू्र्वी घोरबन मोहम्मदपौर यांनी सलाम मुंबई आणि डेले बिघारार यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. ईशाने सांगितले की, त्यांच्या सिनेमांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांच्या सोबत काम करण्याची संधी म्हणजे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. इराणी सिनेमाचा भाग होणे, हे माझ्यासाठी सौभाग्य आहे.



ईशाचे सिनेमे


ईशाने जन्नत २, रुस्तम आणि कमांडो २ या सिनेमात काम केले आहे.तसंच ती बादशाहो सिनेमातही इम्ररान हाश्मीसोबत झळकली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. त्या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्याचबरोबर या सिनेमात अजय देवगन आणि इलियाना डिक्रूज प्रमुख भूमिकेत होते.