मुंबई : वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री मलायका अरोरा प्रचंड सुंदर आणि बोल्ड दिसते. 48 व्या वर्षी सौंदर्य जपण्यासाठी ती फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलाकायच्या बोल्ड अदांचं रहस्य वर्कआऊट आणि योगा आहे. याशिवाय मलायका तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. मलायका अरोराने तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये मलायका प्रचंड हॉट दिसत आहे. सध्या इंटरनेटवर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तिचे फोटो पाहून तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरचं नाही तर मलायकाचे चाहते देखील क्लिन बोल्ड होतील. मलायकाने काळ्या गाऊनमध्ये दिलेल्या पोजमुळे इंटरनेटचं तापमान वाढलं आहे. 



तिच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिच्या लूक आणि सौंदर्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, तू  आश्चर्यकारक दिसत आहेस. याशिवाय चाहते तिच्या फोटोंवर रेड हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.



मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर मलायका अरोरा सध्या 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' या रिअॅलिटी शोचं जज करत आहे. शोमधील तिचे व्हिडीओ अनेकदा समोर येतात, जे खूप पसंत केले जातात. मलायका व्यतिरिक्त या शोमध्ये टेरेन्स लुईस आणि गीता कपूर देखील जज आहेत.