Shivangi Joshi Viral Video: सोशल मीडियावर हल्ली अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यातून अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे व्हिडीओही (Viral Video) व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये हिल्स घातल्यामुळे चिखलात पाय पडल्यावर ती धडपडून पडल्याची दिसते आहे. यावेळी नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून या व्हिडीओखाली नेटकरी नानातऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटकरी अनेकदा त्यांच्या चिडचिड्या स्वभावामुळे आणि अॅटिट्यूडमुळे ट्रोल होताना दिसतात. परंतु हा व्हिडीओ पाहून अनेकांना या अभिनेत्रीची दया आली आहे. (these are the bollywood celebrities who runs their own hotels know how much they earn)


या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की ही अभिनेत्री गाडीतून उतरताना दिसते आहे. ती पांढऱ्या शिमरच्या हिल्स घातल्या आहेत. यावेळी तिनं पेन्सिल हिल्स घातल्या होत्या. परंतु गाडीतून उतरून दोन मिनिटंही झाली नसतील तोच समोरच्या खड्ड्यात तिचा पाय अडकला आणि तिला तोल गेला व पाय सरकला. तेवढ्यात ती धडपडली. परंतु लगेचच आपली (Shivangi Joshi Viral Video) चप्पल घालत ती चालायला लागते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओखाली ट्रोलर्स तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. परंतु यावेळी अनेकांना तिची दयाही आली आहे. 


हेही वाचा - Bollywood सेलिब्रेटींची कोट्यवधींची कमाई; अभिनयाव्यतिरिक्त 'या' कामातून मिळतात पैसे


या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा लुक पाहून अनेकांनी ती निम्रत कौर वाटली आहे, परंतु ती निम्रत कौर नसून ती 'ये रिश्ता क्या केहेलाता हैं' (Yeh Risha Kya Kehelata Hai) या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री शिवांगी जोशी आहे. यावेळी तिचा लुकही हटके होता. तिनं ऑरेंज कलरचा मिनी ड्रेस घातला होता. तिचा ड्रेस हा वन हॅण्ड ऑफ शोल्डर होता. यावेळी तिनं हाफ पोनी लुक केला होता. ट्रोलर्स (Shivangi Joshi Trolled) यावेळी तिचे कौतुकही केले आहे. अशा गोष्टी होतच असतात. त्यात काही चुकीचे नाही. अशा भाषेत काही ट्रोलर्सनी चक्क ट्रोलर्सच सुनावलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'ये रिश्ता क्या केहेलाता है' या मालिकेतून शिवांगी जोशीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोईंगही खूप आहे. ये रिश्ता क्या केहेलाता हैं या मालिकेशिवाय तिनं इतरही अनेक मालिकांमधून कामं केली आहे. सध्या तिच्या या व्हिडीओखाली नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. काहींनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत सरळ फोटोग्राफर्सनाच ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.