PHOTO : टॅल्कम पावडरची जाहिरात अन् पहिला चित्रपट, रातोरात बनली सुपरस्टार, एका निर्णयाने करिअर उद्ध्वस्त

Entertainment : 2003 साली सलमान खान स्टारर चित्रपट या अभिनेत्रीला आणि अगदी सलमान खान या दोघांचा करिअरला कलाटणी मिळाली होती. सलमान खानसाठी तर हा चित्रपट जणू वरदान ठरला होता. अनेक फ्लॉप चित्रपटानंतर सुपरहिट चित्रपटामुळे त्याला नवं संजीवनी मिळाली होती. 

| Aug 21, 2024, 09:25 AM IST
1/7

टॅल्कम पावडरच्या जाहिरातीतून ग्लॅमरच्या दुनियेत या अभिनेत्रीने प्रवेश केला होती. त्यानंतर अचानक तिला पहिलाच चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. 

2/7

आम्ही बोलत आहोत सलमानची निर्झरा भूमिका चावला हिचा बद्दल. 21 ऑगस्टला 1978 मध्ये तिचा जन्म दिल्लीत झाला. वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. तर तीन भावंडांमध्ये भूमिका सर्वात लहान होती. 

3/7

ग्लॅमर दुनियेत यशाचं स्वप्न पाहणारी भूमिका चावला 1997 मध्ये मुंबईत आली. भूमिकाने इथे म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यावेळी पॉन्ड्स ब्रँड पावडरची जाहिरातून तिला चांगलीच प्रसिद्ध मिळाली. यानंतर भूमिका साऊथ इंडस्ट्रीकडे वळली. 2000 मध्ये साऊथ चित्रपट 'युवाकुडू'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला तिने शुभारंभ केला. 

4/7

भूमिका चावलाला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. या चित्रपटानंतर भूमिकाने साऊथमध्ये अनेक चित्रपट केले. याचदरम्यान भूमिकाला बॉलिवूडमध्ये तेरे नाम या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणारी भूमिका चावलाची कारकीर्दही या चित्रपटामुळे हिट ठरली. 

5/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की भूमिकाला अनेक चित्रपटातून रिप्लेस करण्यात आलंय. तिने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केलाय. या यादीत करिना कपूरचा 'जॉ वी मेट' चित्रपटाचा समावेश आहे. 

6/7

भूमिका चावलाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, योगा शिकता शिकता ती योगा टिचरच्या प्रेमात पडली होती. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये तिने तिचे योग शिक्षक भरत ठाकूर यांच्याशी लग्न केलं. खरं तर, भूमिकाने फिल्मी दुनियेत प्रवेशही केला नव्हता, तेव्हापासून भरत ठाकूर हे भूमिका चावलाचे योग शिक्षक होते. भूमिका आणि भरतला एक मुलगा आहे. 

7/7

भूमिका आता पडद्यावरून गायब झाली आहे, असे अनेकांना वाटत होतं. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती- 'मी एका दोरीवर चालत आहे. जेणेकरून ते माझ्याकडे लक्ष देतील. जर तुम्ही पडद्यावर दिसले नाही, तर लोकांना असं वाटतं तुम्हाला एक मूल आहे आणि आता तुम्हाला चित्रपटांमध्ये रस नाही. दरम्यान भूमिका शेवटची सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात झळकली होती.