घशामध्ये गाठी, डॉक्टर म्हणाले `तुझा कायमचा....`, प्रसिद्ध Actress चा धक्कादायक खुलासा, चाहत्यांना विनंती
`ये रिश्ता क्या कहलाता है` मालिकेतील या लोकप्रिय अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितली आहे. अभिनेत्रीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.
Yeh Rishta Kya Kehlata Hai : छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. आजही या मालिकेतील जुने कलाकारा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. या मालिकेत अक्षराच्या आईची म्हणजेच राजश्री गोयल माहेश्वरीची भूमिका अभिनेत्री लता सभरवाल (Lataa Saberwal) यांनी साकारली होती. लता या आज लाखो घरांमध्ये राजश्री या नावानं ओळखल्या जातात. लता यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या आरोग्याविषयी मोठी अपडेट देच लता यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
लता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लता म्हणाल्या की 'कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या गळ्याच्या आयुबाजूला गाठा झाल्या आहेत. त्यामुळे मला खूप त्रास होऊ लागला होता. हे पाहता मी ENT (कान, नाक आणि घश्याच्या डॉक्टरांकडे गेली होती) त्यांनीच मला सांगितले की माझ्या गळ्यात गाठी झाल्या आहेत, जे ठीक करण्यासाठी मला संपूर्ण एक आठवडा लागेल. मला सध्या स्टेरॉईड्स देण्यात आले आहेत. कारण आता हा एकमेव पर्याय राहिला आहे. हे खूप गंभीर झालं आहे. जर मी याकडे दुर्लक्ष केलं तर माझ्या आवाजावर कायमचा परिणाम होऊ शकतो किंवा माझा आवाज कायमचा जाऊ शकतो. त्यामुळे मी थोडी घाबरली आहे.' ही पोस्ट शेअर करत लतानं कॅप्शन मध्ये म्हटले आहे की कृपया माझ्यासाठी प्रादर्थना करा.
लता यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत लताजी तुम्ही काळजी घ्या. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि फायटर आहात. दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही नक्कीच ठीक व्हाल. तिसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही लवकरात लवकरत ठीक व्हाल. आणखी एक नेटकरी म्हणाला, मी तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हाल ईश्वर तुमच्यासोबत आहे. अशा अनेक कमेंट करत नेटकरी, चाहते आणि सेलिब्रिटींनी लता यांच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : Rajkummar Rao ची प्लास्टिक सर्जरी... अभिनेत्याचा मोठा खुलासा
दरम्यान, लता यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी छोट्या पडद्याला रामराम केला असून सध्या त्या शॉर्ट फिल्म्समध्ये दिसत आहेत. तर यासोबतच त्यांचं लता सबरवाल नावाचे युट्यूब चॅनल आहे. त्यावर त्या मेकअप टीप्स देताना दिसतात.