Rajkummar Rao ची प्लास्टिक सर्जरी... अभिनेत्याचा मोठा खुलासा

Rajkummar Rao चा नुकताच 'भीड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राजकुमार रावनं त्याच्या प्लास्टिक सर्जरीविषयी देखील वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राजकुमार रावला त्याच्या दिसण्यावरून देखील अनेकांनी करिअरच्या सुरुवातीला रिजेक्ट केलं होतं. 

Updated: Mar 25, 2023, 11:50 AM IST
Rajkummar Rao ची प्लास्टिक सर्जरी... अभिनेत्याचा मोठा खुलासा

Rajkummar Rao on Jawline Surgery : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा त्याचा 'भीड' (Bheed) हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजकुमार रावनं पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती. राजकुमार राव सध्या त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार रावनं त्यानं प्लास्टिक सर्जरी केली या अफवांवर वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर चर्चा होती की राजकुमार रावनं त्याच्या जॉ लाइनची सर्जरी केली आहे. त्यावर राजकुमार रावनं वक्तव्य केलं आहे. 

राजकुमार रावनं केली सर्जरी? 

राजकुमार रावनं सिद्धार्थ कननला नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राजकुमार रावला विचारण्यात आले की रेडिटवर एक कमेंट आहे की त्यानं प्लॉस्टिक सर्जरी केली आहे. सिद्धार्थ कननचा हा प्रश्न ऐकताच राजकुमार राव आश्चर्यचकीत होऊन म्हणाला, 'प्लास्टिक सर्जरी, नाही भाऊ, कोणतीच प्लास्टिक सर्जरी केलेली नाही... प्लास्टिक सर्जरी बाप रे बाप.' त्याला पुढे विचारण्यात आलं की अशा गोष्टी तो ऐकतो तेव्हा त्याला काय वाटतं? त्यावर उत्तर देत राजकुमार राव म्हणाला, 'काही वाटत नाही, हसतो मी, लोक बोलतात हे चांगलं आहे.' (Rajkummar Rao Jawline Surgery) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजकुमार रावनं राम गोपाल वर्मा याच्या 2010 साली प्रदर्शित झालेल्या 'रण' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर राजकुमार रावनं 'लव सेक्स और धोखा' या दिबाकर बॅनर्जीच्या चित्रपटात भूमिका साकारली होती. दरम्यान, एक अशी वेळ होती जेव्हा राजकुमार रावला त्याच्या लूक्समुळे नकारण्यात आलं होतं. इतकंच काय तर राजकुमार रावला त्याच्या आयब्रोच्या शेपमुळे रिजेक्ट करण्यात आलं होतं. 

हेही वाचा : 'बेरोजगार मुलींसाठी...', सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याचं Urvashi Rautela नं केलं समर्थन

राजकुमारच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, त्याचा सगळ्यात शेवटी 'मोनिका ओ माई डार्लिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राजकुमार रावसोबत हुमा कुरैशी, राधिका आप्टे, सिकंदर खेर आणि आकांक्षा रंजन कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, राजकुमार रावचा लवकरच इंडस्ट्रियलिस्ट श्रीकांत बोल्ला यांच्या बायोपिकमध्ये देखील तो दिसणार आहे. याशिवाय त्याचा 'मिस्टर एंड मिसेज माही' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करणार आहे.