मुंबई : अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या काळात इतक्या लोकांना मदत केलीय की आता सगळ्यांनाच वाटतं की, आपल्या सगळ्या प्रश्नांवर सोनू सूद हे एकच उत्तर आहे. सोनू सूद अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांचाच मसीहा बनला आहे. अशाच पद्धतीने एका विद्यार्थ्याने सोनू सूदकडे PS4 या व्हिडिओ गेमची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सोनू सूदला एका दहावीच्या विद्यार्थ्याने निरोप दिला आहे. लॉकडाऊनमध्ये माझे सगळे मित्र गेम खेळून एन्जॉय करत आहेत. मला पण PS4 हवा आहे. मला मिळू शकतो का? असा निरोप त्याने दिला आहे. 



विद्यार्थ्याच्या या मागणीवर सोनू सूदने इतकं भारी उत्तर दिलं की सगळेच खूप झाले. सोनू सूद लिहितो की, जर तुझ्याकडे PS4 नाही तर तू खूप भाग्यवान आहेस. काही पुस्तकं घे आणणि वाच. मी हे करू शकतो तुझ्यासाठी. सोनू सूदचं हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आहे. 



अनेकांनी सोनू सूदच्या या उत्तरावर आपली मत व्यक्त केली आहेत. करणहीर बोहराने देखील यावर ट्विट केलं आहे. ha ha ha म्हणतं सुपर सही जवाब असं उत्तर दिलं आहे.