`झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२` : चित्रपट आणि नाटक विभागात तब्बल १३५ नामांकने जाहीर
यंदा झी टॉकीज ह्या सोहळ्याचे ८ वे पर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे .
मुंबई : टेलिव्हिजन च्या इतिहासात विनोदाचा सन्मान करणारा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड हा पहिला आणि एकमेव पुरस्कार सोहळा असून, यंदा झी टॉकीज ह्या सोहळ्याचे ८ वे पर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे . या वर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ अतिशय मोठया स्तरावर, दणकेबाज कार्यक्रमांसोबत होणार आहे. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड २०२२ साठी झी टॉकीजने तब्बल १३५ नामांकने जाहीर केली आहेत. झी टॉकीजचे चाहते या मेगा इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अनेक विनोदवीर झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ ची ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीत आहेत.या अवॉर्ड्सची निवड माननीय ज्युरींद्वारे केली जाणार आहे . या अवॉर्ड साठी फिल्म ज्युरी आहेत श्री. विजय पाटकर , श्री. विद्याधर पाठारे आणि श्रीमती किशोरी शहाणे आणि नाटकासाठी ज्युरी आहेत श्री. अहित भोरे , श्रीमती संजीवनी जाधव आणि श्री. प्रदीप पटवर्धन.
ही नामांकाने चित्रपट आणि नाटकांसाठी एकूण २३ विभागांना देण्यात आली आहेत. झी टॉकीज टीमने नुकतीच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ ची नामांकन यादी मीडियासोबत जाहीर केली. प्रत्येक श्रेणीमध्ये यंदा मजबूत स्पर्धा आहे. तसेच या वेळी पहिल्यांदाच प्रेक्षक पसंदी अवॉर्ड (व्यूव्हर्स चॉईस अवॉर्ड्स), म्हणजे ऑडियन्स वोट वर आधारित विभाग, नव्याने दाखल केले आहेत.
झी टॉकीज ही प्रेक्षकांची लाडकी चित्रपट वाहिनी गेली १५ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या कार्यक्रमांसोबत झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड हा सोहळा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा आहे . चला तर मग, चित्रपट नामांकनांवर एक नजर टाकूया . हा कार्यक्रम आपल्याला 9 ऑक्टोबरला झी टॉकीजवर पाहता येईल.
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट चित्रपट
१) पांडू - निर्माते झी स्टुडिओ
२) डार्लिंग - निर्माते ७ हॉर्स एंटरटेनमेंट , वि पतके फिल्म्स , कथाकार मोशन पिकचर्स
३) टाईमपास ३ - निर्माते झी स्टुडिओ
४) दे धक्का २ - एव्हीके एंटरटेनमेंट , स्काय लाईन एंटरटेनमेंट
५) लोच्या झाला रे - मुंबई मूवी स्टुडिओस , आयडियास द एंटरटेनमेंट कंपनी
६) झोंबिवली - सारेगामा
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट दिग्दर्शक :
१) विजू माने - पांडू
२) समीर आशा पाटील - डार्लिंग
३) रवी जाधव - टाईमपास ३
४) महेश मांजरेकर , सुदेश मांजरेकर - दे धक्का २
५) परितोष पेंटर - लोच्या झाला रे
६) आदित्य सरपोतदार - झोंबिवली
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट लेखन :
१) विजू माने , कुशल बद्रिके , राजेश देशपांडे , समीर चौगुले - पांडू
२) प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव - टाईमपास ३
३) महेश मांजरेकर आणि गणेश मतकरी - दे धक्का २
४) परितोष पेंटर आणि प्रसाद खांडेकर - लोच्या झाला रे
५) समीर आशा पाटील - डार्लिंग
६) महेश अय्यर, साईनाथ गांवाद, सिद्धेश पुरकर, योगेश जोशी - झोंबिवली
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ सर्वोकृष्ट अभिनेता :
१) भाऊ कदम - पांडू
२) प्रथमेश परब - टाईमपास ३
३) मकरंद अनासपुरे - दे धक्का २
४) अंकुश चौधरी - लक डाउन बी पॉसिटीव्ह
५) अमेय वाघ - झोंबिवली
६) प्रथमेश परब- डार्लिंग