मुंबई : 19 फेब्रुवारी 1630 रोजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी मुठभर मावळ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी माहराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आपल्या आई-वडीलांची इच्छा पूर्ण केली. शिवाजी महाराज आज प्रत्येकाचा आदर्श आहेत. आज जागो-जागी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  
 
अभिनेता रितेश देशमुखने फार अनोख्या पद्धतीत शिवजयंती साजरी केली. रितेश हा फक्त उत्तम अभिनेता नसून उत्तम चित्रकार सुध्दा आहे. रितेशने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन महाराजांचे चित्र साकारताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने 'छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर हा एक विश्वास आहे, विचार आहे तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जगलाच पाहिजे' असं म्हणत त्याने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. 




 
पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 भारतीय सीआरपीएफ जवान शहीद झाले. शहीद जवानंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हात पुढे सरसावत आहेत. रितेश देशमुख स्टारर सिनेमा 'टोटल धमाल'च्या टीमने जवानांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत केली. त्याचप्रमाणे इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धमाल' सिरीजचा 'टोटल धमाल' हा तिसरा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय सिनेमाचा अभिनेता आणि निर्माता अजय देवगनने घेतला आहे.