चरबी कमी करण्यासाठी ७ गोष्टी
आज बाजारात पोटावरची चरबी, वजन कमी करणे, बारीक होणे यासाठी खुप सारे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रोडक्टमध्ये केमिकल्सचा वापर सर्रास केला जातो. परंतु याचं सेवन करणे शरीरासाठी खूप घातक आहे. त्यामूळे शरीरामध्ये वेगवेगळे दुष्परिणाम दिसू लागतात. यापेक्षा नैसर्गिक मार्गाचा वापर करावा. याला काही वेळ जरूर लागेल. पण याचे काहीच दुष्परिणाम होणार नाहीत.
मुंबई : आज बाजारात पोटावरची चरबी, वजन कमी करणे, बारीक होणे यासाठी खुप सारे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रोडक्टमध्ये केमिकल्सचा वापर सर्रास केला जातो. परंतु याचं सेवन करणे शरीरासाठी खूप घातक आहे. त्यामूळे शरीरामध्ये वेगवेगळे दुष्परिणाम दिसू लागतात. यापेक्षा नैसर्गिक मार्गाचा वापर करावा. याला काही वेळ जरूर लागेल. पण याचे काहीच दुष्परिणाम होणार नाहीत.
१. लसूण
लसूण एक नैसर्गिक अॅंटी बायोटीक आहे. रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. शरीरातील हार्मोन्स सक्रिय करण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करते. आपल्या डाएटमध्ये लसणचा वापर जरूर करून बघा.
२. ग्रीन टी
हल्ली वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी वापर केला जातो. गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी खूपच लोकप्रिय आहे. ग्रीन टी मध्ये catechins नावाचे संयुगे आहेत. ते चरबी कमी करण्यास मदत करते.
३. केळी
तुम्हाला जर फळे खायची सवय असेल तर, आत्तापासूनच केळे खायला सुरू करा. केळयामध्ये भरपूर पोटॅशियम असतात. त्यामूळे वजन कमी करण्यास मदत होते.
४. पुदीना
एक कप कोमट पाण्यात पुदिन्याची पाने टाका. मधाचाही वापर आपण यामध्ये करू शकतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठीही पुदीना उपयुक्त आहे.
५. दालचिनी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. सकाळी नाश्त्यामध्ये आणि झोपण्यापुर्वी तुम्ही एक कप पाण्यामध्ये एक चम्मच दालचीनी पावडर टाका. हे पेय दररोज पियाल्याने तुम्हाला थोडयाच दिवसात निश्चितच फरक जाणवेल.
६. सफरचंद
दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॅाक्टरांकडे जायची गरज पडत नाही. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. सफरचंदमध्ये पोटॅशियम असल्यामूळे भूक लवकर लागत नाही. वजन कमी करण्यासही मदत होते.
७. ओमेगाचे ३ गोष्टी
अन्न-पेयमध्ये ओमेगा ३ भरपूर प्रमाणात आढळले जाते. यामुळे वजन कमी करण्यास निश्चितच मदत होते.