मुंबई : लहान मुलांमधील न्यूमोनियाचे  ( pneumonia) प्रमाण यंदा ३० टक्क्यांनी वाढले आहे. न्यूमोनियाचा ( pneumonia) त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण हवेतील प्रदूषण (Air pollution) हे आहे. कोरोनाच्या उद्रेकात आता लहान मुलांमधील (children ) न्यूमोनिया ( pneumonia) हे नव्याने आलेले आव्हान आहे, असे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. यंदा ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्ग (coronavirus)  झालेल्यांना न्यूमोनियाचा धोका सर्वाधिक आहे. (protect your children from pneumonia)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूमोनिया होण्यामागे वेगवेगळी कारणे असली तरीही मुख्यतः विषाणूजन्य संसर्ग आणि आणि जंतूसंसर्गातून हा होता. न्यूमोनियाचा त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण हवेतील प्रदूषण (Air pollution) आहे. हिवाळ्यात लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका असतो; पण यंदा वय वर्षे ५ ते १०मधील मुला-मुलींमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांना न्यूमोनियाचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे यावर्षी न्यूमोनियाचे गांभीर्य वाढले आहे. त्यातून गुंतागुंत वाढल्याचे मत कोलंबिया एशिया हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बागडे यांनी व्यक्त केले. 


न्यूमोनिया होण्यामागे वेगवेगळी कारणे असली तरीही मुख्यतः विषाणूजन्य संसर्ग आणि आणि जंतूसंसर्गातून हा होता. न्यूमोनियाचा त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण हवेतील प्रदूषण आहे. हिवाळ्यात हवेचे अभिसरण कमी झालेले असते. त्यामुळे प्रदूषक घटक जमिनीच्या लगत तरंगत असतात. हवेतील हे दूषित घटक श्‍वसनातून थेट फुफ्फुसात जातात. न्यूमोनियामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते, अशी माहिती डॉ. बागडे यांनी दिली. 


न्यूमोनियाचा धोका 



- लहान मुलांमध्ये तीव्र श्वसन संक्रमणाचा (एआरआय) गंभीर आजार 
- देशात सुमारे १७ टक्के बालकांच्या मृत्यूचे कारण 
- कोरोनामुळे हा आजार होण्याची शक्‍यता वाढते 


लहान मुलांमधील कारणे 


- कुपोषण 
- पहिल्या सहा महिन्यांत स्तनपान न होणे 
- कमी वजन आणि लसीकरणाचा अभाव 


आजाराला हेही कारणीभूत 


एखाद्या मुलास विषाणू, बॅक्‍टेरिया किंवा बुरशी जसे की स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया व हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी (एचआयबी) या दोन्ही बॅक्‍टेरियामुळे हा आजार होतो.



बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना खेर यांनी सांगितले, न्यूमोनिया प्रतिबंधात्मक 'लस'चा अभाव हे भारतातील मुलांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. नुकतीच देशात न्यूमोकोकल कन्जुगेट लस (पीसीव्ही) सुरू झाल्यामुळे मुलांचा या आजारापासून बचाव करता येईल. लॉकडाउन आणि इतर प्रतिबंधांमुळे यावर्षी नेहमीची लसीकरण प्रक्रिया विस्कळीत झाली. अद्याप कोरोनाची लस बाजारात उपलब्ध नसल्याने जास्तीत जास्त मुलांना न्यूमोनियाची लस देण्याचा सल्ला दिला जातो.