मुंबई : मोबाईलचे अनेक फायदे आहेत. मात्र मोबाईलचे जितके फायदे आहेत तितके त्याचे तोटेही आहेत. मोबाईलने आपले जीवन खूप सोपं केलंय. पण जास्त वेळ वापरल्यास आरोग्यालाही हानीही पोहोचते. दिवसभर फोन वापरल्यानंतर आपण रात्रीही फोन सोडत नाहीत. त्याचा शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. जाणून घेऊया रात्री उशिरापर्यंत मोबाईल चालवण्याचे तोटे-


ताण वाढतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही होतो. यामुळे थकवा, ताण किंवा तणाव वाढतो. रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे तणावाची पातळी वाढते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीही थकवा जाणवू शकतो.


डार्क सर्कल 


रात्री उशिरापर्यंत फोनचा वापर केल्यास त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. जर तुम्ही रात्री जास्त वेळ फोन वापरत असाल तर तुम्हाला डार्क सर्कलची समस्या निर्माण होऊ शकते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे डोळ्यांखालील भागात डार्क सर्कल्स येतात.


निद्रानाश


रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने निद्रानाशाच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर केल्याने मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते. यामुळे तुम्हाला झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी थकवाही जाणवण्याची शक्यता आहे.


बुद्धीमत्तेवर परिणाम


रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्यामुळे मेंदूवरही परिणाम होतो. फोन जास्त वेळ वापर केल्याने मेमरी कमकुवत होऊ शकते. एवढेच नाही तर मेंदूचे आजारही होऊ शकतात. जेव्हा आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतो तेव्हा त्याचा परिणाम थेट आपल्या मेंदूवर होतो. यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.