मुंबई : आपण सर्वच जाणतो की, कांजण्या म्हणजेच चिकन पॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. तसंच हा आजार ठिक होण्यासाठी घरातून बाहेर न पडणे, स्वच्छता राखणे, अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणून कांजण्या आल्यावर या ५ चूका करु नका.


थंड खाणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांजण्या आल्याने शरीरात खूप सारी उष्णता उत्पन्न होते. त्यामुळे थंड किंवा फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण असे केल्याने इंफेक्शन फुफ्फुसांपर्यंत जावून न्युमोनिया होण्याची भिती असते. त्यामुळे थंड पदार्थ खाणे टाळा.


पुरेसे पाणी न पिणे


कांजण्या आल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही. तर ताप आल्यामुळे पाणी पिण्याचे मन होत नाही. पण इंफेक्शनचा सामना करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीराचे तापमान आणि उष्णता नियंत्रित राहते.


स्वच्छता न राखणे


कांजण्या आल्यावर स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा कांजण्या फुटल्यावर त्यातून बाहेर येणाऱ्या पदार्थामुळे बॅक्टेरिअर इंफेक्शन होण्याची संभावना अधिक वाढते.


एकमेकांचे कपडे वापरणे


एकमेकांचे पांघरुण, कपडे वापरल्याने कांजण्या पसरण्याचा धोका असतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणाऱ्या या आजारापासून बचाव करण्यासाठी ही मोठी चूक टाळा.