मुंबई : जर नेहमी नीट ब्रश करूनही तुमच्या तोंडाचा वास येत असेल, तर लगेच डॉक्टरांना भेट द्या. संशोधनानुसार तोंडातून नेहमी वास येत असेल, तर टाइप २ मधुमेह, फुफ्फुसे, लिव्हर आणि किडनी संबंधित विकार असू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुफ्फुसांमध्ये असलेल्या इंफेक्शनमुळे ही खूप वेळा श्वासातून दुर्गंध येतो. लिव्हर इंन्फेक्शनमुळे ही अपचनाशी संबंधित त्रास होऊ लागतात. त्यामुळे श्वास आणि तोंडातून वास येतो.


टाइप-२ मधुमेह असल्यास शरीरात ग्लुकोजची कमतरता असते आणि त्यामुळे तहान खूप लागते, ज्यामुळे तुमचे तोंड कोरडे पडते. त्याचबरोबर मधूमेहामुळे शरीरात मेटाबॉलिक म्हणजेच पचनाशी संबंधित बदल होतात. त्यामपळे तोंडातून वास येतो.


किडनी विकारामुळे शरिरातील पचनक्रिया म्हणजे चयापचयाशी संबंधित (मेटाबॉलिक) बदल होतात. त्यामुळे तोंड कोरडे होते, म्हणुन तोंड कोरडं पडतं.