मुंबई : आजकाल तरुणींना अॅक्नेची समस्या वारंवार सतावते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचा लालसर होणे, पिंपल्सचे डाग राहणे यामुळे सौंदर्य अधिकच बिघडते. अनेकजणींना असे वाटते की चेहऱ्याची स्वच्छता न राखल्यामुळे अॅक्ने येतात. परंतु, हे चुकीचे आहे. खरंतर अॅक्ने येण्याची कारणे वेगळी आहेत. हार्मोन्सचे असंतुलन, ताण, सिबमची निर्मिती, बंद पोर्स, बॅक्टरीया यामुळे अॅक्नेची समस्या उद्भवते. या सगळ्या समस्या असतील आणि तुम्ही कितीही वेळा चेहरा धुतला तरी पिंपल्स येतात. 


अॅक्नेवर अनेक घरगुती उपाय आहेत. परंतु, पिंपल्स आणि त्यामुळे होणारे त्वचेचे त्रास दूर करण्यासाठी डाळींब उपयुक्त ठरते. म्हणजेच डाळिंब हेल्दी असण्याबरोबर सौंदर्यवर्धक देखील आहे. जाणून घेऊया पिंपल्स हटवण्यासाठी डाळिंबाचा कसा उपयोग होतो ?



१. जळजळ कमी होते: डाळींबामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असल्याने त्याचा परिणाम अॅक्नेच्या वाढीवर होतो. आणि पिंपल्स येण्याची समस्या आटोक्यात येते.


२. पिंपल्सची वाढ कमी होते: डाळिंबाचा गर त्वचेवर लावल्यास पिंपल्सवर परिणामकारक ठरतो. त्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही. तसंच त्यामुळे पिंपल्समुळे त्वचा लालसर होण्याची समस्या देखील दूर होते. 


३. बॅक्टरीयाची वाढ नियंत्रणात येते : डाळिंबाचा गर चेहऱ्यावर लावल्याने अॅक्ने येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टरीयांची वाढ देखील नियंत्रणात येते.


डाळिंबाचा वापर नेमका कसा करावा ?


डाळींब हे चवीला चांगले असल्याने तुम्ही ते सोलून खाऊन शकता किंवा ज्यूस घेऊ शकता. डाळिंबाची साल आणि रस दोन्ही पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. डाळिंबाची साल सुकवून त्याची पावडर करा. त्यात मध घालून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. डाळिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने देखील सारखाच फायदा होतो.