मुंबई :  पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषध -गोळ्या किंवा अ‍ॅन्टासिडची आवश्यकता नसते. अनेकदा तुमच्या आहारातील बदल पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. 
फार काळ काहीही न खाल्ल्यास किंवा पाणी कमी प्यायल्यास आणि दगदग अधिक झाल्यास त्रास होऊ शकतो. अशावेळेस वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास तुमच्या आहारात बदल करा. तसेच ही पेय आहारात प्रमाणात प्यावीत. पित्ताचा त्रास कमी करतील ही '5' फळं 


कॉफी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटते. मात्र रिकाम्यापोटी कॉफी प्यायल्यास त्रास होऊ शकतो. कॅफिन घटक शरीरातील अ‍ॅसिड रिफल्क्स वाढवतात. 



चहा 


कॉफी प्रमाणेच चहादेखील आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. सकाळी उठल्यावर पहिलं पेय चहा हे कधीच असू नये. ते शरीराला अधिक त्रासदायक ठरते. रिकाम्यापोटी चहा पिणं त्रासदायक ठरू शकते. 


कार्बोनेटेड ड्रिंक्स 


आजकाल फास्टफूडच्या जामान्यात जेवणासोबत कार्बोनेटेड ड्रिंक्स प्यायली जातात. यामुळे आरोग्याला अपाय होऊ शकतो. अन्ननलिकेतून अ‍ॅसिड विरुद्ध दिशेला फेकले जाते. 


अल्कोहल  


अल्कोहल आरोग्याला अनेकप्रकारे त्रासदायक ठरते. त्यामुळे त्याचा आहारातील समावेश प्रमाणात असणं गरजेचे आहे. जितके जास्त प्रमाणात अल्कोहल पोटात जाईल तितके पोटात पित्ताचे प्रमाण निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.  


सायट्र्स ड्रिंक्स  


प्रामुख्याने संत्र, मोसंबी, लिंबू यासारखी फळं आरोग्याला त्रासदायक ठरतात. पित्ताचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी आहारात सायट्रस फळांचा रस अधिक प्रमाणात घेणं अपायकारक आहे. यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते.