मुंबई : फार काळ काहीही न खाल्ल्यास सहाजिकच शरीरामध्ये असंतुलन निर्माण होण्यास मदत होते.
प्रामुख्याने उपावासाची सवय नसेल किंवा जेवणाच्या वेळा चूकल्यास पित्ताचा म्हणजेच अॅसिडीडीचा त्रास होतो.
अॅसिडीटी आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्हांला प्रत्येक वेळेस डॉक्टरांची औषधं किंवा अॅन्टासिड्सची गरज नसते. तर काही वेळेस तुम्ही आहारात फळांचा समावेश केल्यास पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
हिवाळ्याच्या दिवसात आवळा मुबलक उपलब्ध असतो. त्यामुळे पित्ताचा त्रास होत असल्यास मोरावळा, पाकातला आवळा, आवळा सुपारी किंवा केवळ मीठ लावलेला आवळा खाल्ल्यास फायदेशीर ठरतो.
टरबूजामध्ये पाण्याचा अंश मुबलक असतो. अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास त्याचे सेवन करा. म्हणजे पोटातील नाजूक स्नायूंचे नुकसान होणार नाही. तसेच पुन्हा अॅसिडीटी उदभवण्याचा त्रास आटोक्यात राहतो.
जेवणानंतर सफरचंद खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामुळे अॅसिडीटी वाढण्याची शक्यता कमी होते. सफरचंदामुळे पोटात अल्कलाईन घटक निर्माण होतात परिणामी अॅसिड आटोक्यात राहण्यास मदत होते.
पेरमधील पीएच व्हॅल्यू ३.५ ते ४.६ असते. यामुळे हे लो अॅसिडीक फळ आहे. तसेच यामध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पचन सुधारण्यास मदत होते. पोटातील अॅसिडची पातळी वाढल्यास त्याचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
केळ देखील पित्ताप्रमाणे पचनाच्या अनेक समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत करते. पोटात अॅसिडची पातळी आटोक्यात राहाते.