मलेरियावर होणार `सेक्स अॅटॅक`; बिल गेट्सनी आखला गेम प्लान
नर वर्गातले डास शोधले जातील व त्यांच्यात विशिष्ट प्रकारचे जिन्स सोडले जातील. ते जेव्हा मादी डासासोबत सेक्स करतील तेव्हा ते स्वात: मरून जातील.
मुंबई: जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व बिल गेट्सनी अवघ्या जगालाच मलेरियामुक्त करण्याचा विडा उचलला आहे. जगातील असंख्य नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या मलेरियाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बिल गेट्स यांनी विज्ञानाचा सहारा घेतला आहे. शुक्रवारी (२२ जून) पुढे आलेल्या माहितीनुसार बिल गेट्स यांनी एका प्रयोगशाळेला सुमारे २७ कोटी रूपयांपेक्षाही अधिक निधी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयोगशाळेत अशा तंत्रज्ञानावर संशोधन केले जात आहे. ज्यामुळे मलेरियाला कारण ठरणाऱ्या डासांनी आपसांत सेक्स केला की ते ठार होतील. त्यामुळे मलेरियाच्या डासांची पैदास कमी होईल आणि जगाला सुटका मिळेल. बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांच्याकडून या उपक्रमासाठी मोठा निधी पूरवला जात आहे.
प्रतीवर्ष ६० कोटी लोकांना मलेरियाची बाधा
मलेरियाला संपवीण्यासाठी एक मोठी मोहीम आखण्यात आली आहे. जगभरातून प्रतीवर्ष सुमारे १० लाखांहूनही अधिक लोक मलेरियामुळे मृत्यू पावतात. मलेरियाला जगातील कोणत्याही घातक प्राण्यापेक्षा भयंकर मानले तर नवल वाटू नये. एका निरिक्षणानुसार मलेरियामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अफ्रीकेत अधिक आहे. त्यात लहान मुलांचा मोठा समावेश आहे. जगभरात सुमारे ६० कोटी लोकांना मलेरियाची लागन होते.
विशिष्ट डासांमुळे डासांचा मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, मलेरिया पसरविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची परंपरा शोधली जाईल. त्यानंतर या डासांमधील नर वर्गातले डास शोधले जातील व त्यांच्यात विशिष्ट प्रकारचे जिन्स सोडले जातील. ते जेव्हा मादी डासासोबत सेक्स करतील तेव्हा ते स्वात: मरून जातील. मादी जातीचा डास चावल्याने मलेरियाची लागण होते. सुरू असलेल्या संशोधनानंतर डास जेव्हा सेक्स करतील तेव्हा संशोधकांनी शोधलेले ते विशिष्ट जिन्स नर डासाच्या माध्यमातून मादी डासांमध्ये संक्रमित होतील. त्यानंतर विशिष्ट वेळेनंतर हा डास मरेल. याचाच अर्थ असा की, हळू हळू डासांची संख्या मर्यादीत होत जाईल.
गेट्स फाऊंडेशनचे आभार
यूकेची ऑक्सिटिक नावाची एक कंपनी मलेरिया विरोधी जिन्स असलेल्या डासांची निर्मिती करेन. या डासांना 'फ्रेंडली मॉस्किटो'नावाने ओळखले जाईल. या डासांची निर्मिती साधारण २०२० पर्यंत होण्याची शक्याता आहे. ऑक्सिटिकचे चीफ एग्जिक्युटिव ग्रे फ्रेंडसेन यांनी या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी पुरवल्याबद्धल गेट्स फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.