मुंबई : भारतात अनेकांचा चहा हा आवडीचा विषय आहे. अनेकांची चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. अनेक जण दुधाचा चहा पितात तर आता ग्रीन टी देखील लोकांच्या आयुष्यातला एक महत्त्त्वाचा भाग झाला आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या चहाबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा थकवा आणि तणाव लगेचच गायब होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ब्लू टी काय आहे. ब्लू टी गोकर्णाच्या फुलापासून बनवला जातो. हे फूल खूपच सुंदर दिसतं. पण याचे आरोग्यासाठी फायदे देखील आहेत.


असा बनवा ब्लू टी


सगळ्यात आधी एक पॅनमध्ये पाणी गरम करा. त्यानंतर त्याच्यात एक चम्मच साखर आणि एक फूल टाका. थोड्या वेळ उकळल्यानंतर त्याचा रंग निळा होईल. यानंतर तुम्ही ब्लू टीचा स्वाद घेऊ शकता.


ब्लू टी पिण्याचे फायदे


1. विषारी तत्वापासून दूर


ब्लू टीमध्ये मोठ्य़ा प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट असतं. यामध्ये आढळणारे Bio-compounds तुमच्या शरीराचं विषारी गोष्टीपासून संरक्षण करतात. एजिंगपासून ही आराम मिळतो. रेडिकल्स सोबत देखील ते लढतात.


2. हृद्याचं आरोग्य


ब्लू टी जर तुम्ही जेवणाच्या आधी किंवा नंतर घेतला तर तुमच्या शरीरातील ग्लूकोज आणि ब्लड शुगरचं प्रमाण संतुलित राहतं. शरीराचं इंफेक्शनपासून बचाव करतात. हृद्यासाठी ब्लू टी आरोग्यदायी ठरतो. 



3.केस आणि त्वचेचं संरक्षण


ब्लू टी तुमचे केस आणि त्वचा याच्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स असतात.


4. बुद्धीला चालना


ब्लू टीच्या सेवनाने तुमच्या बुद्धीलाही चालना मिळते. यामुळे माइंड फ्रेश राहतो.


5. तणाव आणि चिंता करतो दूर


ब्लू टी प्यायल्याने तणाव आणि चिंता दूर होतात.


6. कँसरपासून संरक्षण


ब्लू टीचं फूल गोकर्णामध्ये अँटी ऑक्सीडेंट असल्याने कँसर सारख्या आजारांना तो दूर ठेवतो. 


7. डायबिटीज कंट्रोल करतो


फुलामध्ये असे काही अंश आहेत जे ग्लूकोज कंट्रोल करतात. डायबिटीज असलेल्या व्यक्तींना हा आरोग्यादायी ठरु शकतो.